मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन
मागील काही दिवसात दादरमधील कबुतरखान्याचा प्रश्न चांगलाच चर्चेत राहिला. महापालिकेने हा कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजातील काही लोकांनी या निर्णयाविरुद्ध आंदोलन केले. तसेच नवीन कबुतरखाना सुरु होणार का? असे प्रश्न देखील उपस्थित होत होते. आज अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
नुकतेच मुंबईतील नॅशनल पार्क येथे नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याहस्ते करण्यात आले. नॅशनल पार्क येथील जागेत हा कबुतरखाना बांधण्यात आला असून या कबुतरखान्याचा त्रास कोणाला होणार नाही, असा आश्वासन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्य म्हणजे, स्थानिक रहिवाशांचे हित जपून प्रत्येक वॉर्डात नवे कबुतरखाने सुरु करण्याचा मानस असल्याचे लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉक्टरकडून डॉक्टरची फसवणूक! दाखवले आमिष… पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
मुंबईतील कबुतरखान्याचा प्रश्नावरुन काही दिवसांपूर्वी राजकीय वाद पेटला होता. त्यातच ही लढाई न्यायालयात सुद्ध गेली होता. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारतर्फे समितीची घोषणा करण्यात आली होती. कबुतरखान्याबाबत वाद सुरु झाल्यानंतर मुंबईतील नॅशनल पार्कसारख्या ठिकाणी कबुतरखाना हलविण्यात यावा, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. अखेर रविवारी जैन समाजाच्या मदतीने या ठिकाणी नव्या कबुतरखान्याची निर्मिती करण्यात आली असून त्याचे उद्घाटन मंत्री लोढा यांच्याहस्ते पार पडले.
Matheran News : रोड रोलर रस्त्याच्या मध्यभागी नगरपरिषदेचा हलगर्जीपणा; नागरिकांचा संताप व्यक्त
या उद्घाटनंतर मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, काही दिवसांपूर्वी जैन समाजाकडून याठिकाणी कबुतरखाना उभारण्यासाठी पाहणी केली होती. त्यानंतर एक महिन्याच्या आत याठिकाणी कबुतरखाना उभारण्यात आले आहे. आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या जागेवर नवे कबुतरखाना उभारण्यात येणार असून ही जागा नॅशनल पार्कच्या अख्त्यारित येते. त्यामुळे या कबुतरखानाचा त्रास कुणालाही होणार नाही. लवकरच प्रत्येक वॉर्डात अशा ठिकाणी कबुतरखाना उभा करण्याचा आमचा मानस आहे, ज्यामुळे कबुतरांचे रक्षण होईल आणि नागरिकांनाही त्याचा त्रास सहन होणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.