
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने मुंबावची दाखल
मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत केला महत्वाचा करार
राज्यात १५ लाख रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज
मुंबई: सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने मुंबईत दाखल झाले आहेत, महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये महत्वाचा करार पार पडला आहे. मायक्रोसॉफ्ट राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यताब आहे, या गुंतवणुकीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे.
Maharashtra sets a new benchmark for digital safety Delighted to meet @satyanadella at #AITourMumbai as we unveiled MahaCrimeOS AI—India’s first AI-powered platform to fast-track cybercrime investigations.
Scaling from 23 police stations to 1100 ; From Nagpur to statewide… pic.twitter.com/Qe1V8hSY5c — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2025
महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये ग्लोबत कॅपॅबिलिटी सेंटर हा महत्वाचा प्रकल्प उभारण्याबाबत करार झाल्याचे समजते आहे. हा प्रकल्प जवळपास २० लाख स्केवर फुटांवर उभारले जाणार आहे. यामुळे जवळपास १५ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
सत्या नडेला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात राज्याला एआय हब बनवण्यासंदर्भात देखील चर्चा झाल्याचे समोर आले आहे. गुन्हेगारी नियंत्रण करणे, आरोग्य, शिक्षण आणि कृषी विभागात एआयचा कशा प्रकारे वापर करता येईल यावर चर्चा झाल्याचे समजते आहे. मायक्रोसॉफ्ट भारतात १.५७ लाख कोटींची गुतंवणूक करणार असल्याचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांनी ‘या’ महामार्गाच्या सुधारित आखणीस दिली मान्यता
नागपूर – चंद्रपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अंतर्गत केंद्र शासनाच्या गतीशक्ती पोर्टलकडून प्राप्त सूचनांचा विचार करून एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुंबई शहरातील घाटकोपर पूर्व, चेंबूर आणि अंधेरी (प.) आंबिवली मुद्रण कामगार नगर व चुनाभट्टी येथील भूखंडांचा खासगीकरणाच्या माध्यमातून विकासाच्या मुदतवाढीस देखील आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रवास सुखकर होणार! CM देवेंद्र फडणवीसांनी ‘या’ महामार्गाच्या सुधारित आखणीस दिली मान्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पुणे जिल्ह्यातील हडपसर ते यवत मार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात. मात्र हे करताना नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. या मार्गावर रस्त्याची सुधारणा करण्यात येऊन उन्नत महामार्ग बांधण्यात यावा. भैरोबा नाल्याजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक व तातडीच्या उपाययोजना कराव्यात.