Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis on NCP Merger:  राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी…; विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस स्पष्टचं बोलले

अजितदादांचे काही बोलणे झाले असते तर त्यांनी आम्हाला सांगितलं असते. ते आमच्या सरकारमध्ये होते. त्यामुळे आमच्याशी न बोलता ते असा निर्णय घेऊ शकतील का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 01, 2026 | 04:01 PM
Devendra Fadnavis on NCP Merger:  राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी…; विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस स्पष्टचं बोलले
Follow Us
Close
Follow Us:
  • दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा
  • राष्ट्रवादीने विलीनीकरणासाठी आमच्यासोबत चर्चा करावी- देवेंद्र फडणवीस
  • मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो की विलीनीकरणाची चर्चा झाली होती- शशिकांत शिंदे
CM Devendra Fadnavis on  NCP Merger : राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून विलीनीकरणाचे दावे वाढू लागले आहेत.यावरून राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis on NCP Merger:  राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी…; विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस स्पष्टचं बोलले

या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत काही दावे केले आहेत.”राष्ट्रवादीने विलीनीकरणासाठी आमच्यासोबत चर्चा करावी. अजितदादांचे काही बोलणे झाले असते तर त्यांनी आम्हाला सांगितलं असते. ते आमच्या सरकारमध्ये होते. त्यामुळे आमच्याशी न बोलता ते असा निर्णय घेऊ शकतील का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. अजितदादांच आणि पवार साहेब किंवा इतर कोणाशी काय बोलणं झालं, याबाबत मला कोणतीही माहिती नाही. पण अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही, आज अजित पवार आणि शरद पवार साहेब असे दोन दोन पक्ष झाले आहेत. अजित पवारांच्या पक्षाने त्यांच्या पक्षाचे नेतृत्त्व सुनेत्रा पवार यांनी करावे, असा निर्णय झाला. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आहे.अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्ष हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील, त्यांच्या पाठिशी उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे.” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

Sunil Tatkare on Both NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बारामतीत

देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर बोलताना शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, मी फार प्रामाणिकपणे बोलतो की माझं आणि अजितदादांच बोलणं झालं होतं.मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो की विलीनीकरणाची चर्चा झाली होती. पण अजितदादांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली की नाही केली, याबाबत आम्हाला काही माहिती नाही. ज्यावेळी दादा यायचे त्यावेळी आम्ही प्रातांध्यक्ष आणि तुमच्या लोकांशी बोललात का, असं विचारायचो, त्यावेळी ते मी सांगितलं आहे. असं सांगायचे. मी निर्णय घेणार आहे. आपण निर्णय घ्यायचा. तुम्ही वरिष्ठांची बोलतात का, यावरही ते बोललो असल्याचे सांगायचे. पण विलीनीकरणाला कोण नकार देतयं याचं आम्हाला देणं-घेणं नाही, आम्हाला त्याचे भावनिक राजकारण करायचे नाही, राजकीय स्वार्थ साधायचा नाही, पण १२ तारखेला घोषणा करणार होतो. ही अजितदादांची शेवटची इच्छा होती. पण विलीनीकरण करायचं की नाही करायचं याबाबत अजित पवारांच्या पक्षाने आमच्याशी चर्चा करावी, असं फडणवीस म्हणत आहेत. पण आता आम्ही हा विषय आम्ही इथच थांबवत आहोत. असंही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं.

 

Web Title: Devendra fadnavis on ncp merger the ncp should discuss this with us fadnavis spoke clearly on the merger discussions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Baramati Politics
  • CM Devendra Fadnavis
  • NCP Politics

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: “राहुल गांधी हे राजकारणातील ‘सर्वात रिजेक्टेड माल’!”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती प्रहार
1

CM Devendra Fadnavis: “राहुल गांधी हे राजकारणातील ‘सर्वात रिजेक्टेड माल’!”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती प्रहार

“पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा…”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन
2

“पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा…”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

“एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे…”; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
3

“एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे…”; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

“मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
4

“मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.