मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर/istockphoto)
पायाभूत सुविधा मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत मान्यता
द्रुतगती महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता
मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक
नागपूर: नागपूर – चंद्रपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग (Highway) अंतर्गत केंद्र शासनाच्या गतीशक्ती पोर्टलकडून प्राप्त सूचनांचा विचार करून एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुंबई शहरातील घाटकोपर पूर्व, चेंबूर आणि अंधेरी (प.) आंबिवली मुद्रण कामगार नगर व चुनाभट्टी येथील भूखंडांचा खासगीकरणाच्या माध्यमातून विकासाच्या मुदतवाढीस देखील आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पुणे जिल्ह्यातील हडपसर ते यवत मार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात. मात्र हे करताना नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. या मार्गावर रस्त्याची सुधारणा करण्यात येऊन उन्नत महामार्ग बांधण्यात यावा. भैरोबा नाल्याजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक व तातडीच्या उपाययोजना कराव्यात.
गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांचा गेम होणार! CM देवेंद्र फडणवीसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राज्यात सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच प्रस्तावित प्रकल्पांना गती शक्ती पोर्टलकडून मान्यता घ्यावी. प्रत्येक प्रकल्प गतिशक्ती पोर्टलकडून मान्यता आल्यानंतरच समितीच्या बैठकीसमोर यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठकीत सादरीकरण केले. बैठकीस अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, प्रधान सचिव (विधी व न्याय) सुवर्णा केवले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
नागपूर–चंद्रपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या 204 किमी सुधारित आखणीला मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्न झाली. नागपूर – चंद्रपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाअंतर्गत केंद्र शासनाच्या… pic.twitter.com/chz8SKYh9s — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 9, 2025
सुधारित आखणीनंतर नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गातील बदल
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सेलडोह इंटरचेंज ते दुर्ग हैदराबाद महामार्गावरील नवेगाव (मोर)पर्यंत महामार्ग बांधण्यात येणार आहे. याची लांबी 192 किलोमीटर असणार आहे. तसेच 11 किलोमीटर लांबीचा चंद्रपूर जोड रस्ता पूर्वीच्या आखणीनुसार कायम ठेवण्यात आला आहे. अशा एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीस मान्यता देण्यात आली आहे. सुधारित रस्ता आखणीमुळे 27 हेक्टर वन क्षेत्र संपादनात बचत होणार आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा! Pump Storage Projects साठी मोठे करार; वाचा सविस्तर
Pump Storage Projects साठी मोठे करार
राज्याने पंप स्टोरेजमध्ये ७६,११५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारली आहे. महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य असून महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे ५,८०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे. या प्रकल्पात २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११,५०० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.






