Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM बनताच देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर; महत्त्वाच्या पदावरून शिंदेच्या विश्वासू माणसाला हटवलं

महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सत्तेची सूत्र गेली आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले असून पहिल्या दिवसापासूनच ते अॅक्शन मोडवर असलेले पहायला मिळाले.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 11, 2024 | 08:38 PM
CM बनताच देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर; महत्त्वाच्या पदावरून शिंदेच्या विश्वासू माणसाला हटवलं

CM बनताच देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर; महत्त्वाच्या पदावरून शिंदेच्या विश्वासू माणसाला हटवलं

Follow Us
Close
Follow Us:

महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सत्तेची सूत्र गेली आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले असून पहिल्या दिवसापासूनच ते अॅक्शन मोडवर असलेले पहायला मिळाले. आता प्रशासनातही त्यांनी आपली टीम बांधण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांना हटवलं आहे. त्याजागी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान मंगेश चिवटे यांनी रामेश्वर नाईक यांचे अभिनंदन करत रुग्ण, रुग्णसेवक, रुग्णांचे नातेवाईक यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मागील अडीच वर्षात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली. मला मिळालेली संधी मी संपूर्ण प्रामाणिकपणे आणि ध्येयवेड्या पद्धतीने निभावली. याचा मला मनोमन आनंद व अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मंगेश चिवटे काय म्हणाले वाचा त्यांच्याच शब्दातून

प्रथमतः मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या आरोग्यमंदिराच्या सेवेचा कार्यभार माझे मित्र रामेश्वरजी नाईक यांच्याकडे सोपविण्यात मला अत्यानंद होत आहे. सुरुवातीलाच मी त्यांचे अभिनंदन करतो. मागील अडीच वर्षात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून सेवा करण्यास मला मिळालेली संधी ही ईश्वरकृपेने मी संपूर्ण प्रामाणिकपणे आणि ध्येयवेड्या पद्धतीने निभावली, याचा मला मनोमन आनंद व अभिमान आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथ शिंदे  आणि खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे या संवेदनशील पितापुत्रांमुळेच ही रूग्णसेवा करणे शक्य झाले. राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि  अजित पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

राज्यातील सर्व गोरगरीब तथा आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दुर्धर आजारांसाठी (कर्करोग, मेंदुरोग, हृदयविकार, किडणी / यकृत प्रत्यारोपण) तात्काळ आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात स्वतंत्र असा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष असावा, अशी संकल्पना मी २०१४ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा मांडली होती; त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना त्यांनी ११ मार्च २०१५ मध्ये या संकल्पनेस मान्यता दिली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अस्तित्वात आला.

जून २०२२ मध्ये शिवसेना मुख्यनेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाल्यानंतर शिवसेना- भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झाले. या महायुती सरकारच्या काळात संवेदनशील मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागील अडीच वर्षामध्ये, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा अंतर्गत, कक्ष प्रमुख म्हणून कार्यरत असताना आमच्या निस्वार्थी टीमच्या साथीने एकूण ४१९ कोटी पेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले. यामुळे ५१ हजार पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचले. (रुग्णांच्या मदतीसाठी एकुण ३८१ कोटी २० लक्ष रुपये, तर नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये नुकसान भरपाई मदत म्हणुन ३८ कोटी ६६ लक्ष रुपये वितरीत करण्यात आले).

गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कामकाज रोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत दररोज सुमारे १२ तास सुरु असे. सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या सहकाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी देखील कामकाज सुरू असे. अगदी सण-उत्सवाच्या काळात देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या सहकाऱ्यांनी काम केले. त्याबद्दल मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधील सर्व निस्वार्थीपणे काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा मी आयुष्यभर ऋणात राहील.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत सर्वसामान्य रुग्ण डोळ्यासमोर ठेवून अनेक विविध बदल करत १०० टक्के पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला.

१) यामध्ये टोल फ्री क्रमांक ८६५०५६७५६७ सुरु केला. सोबतच रुग्णांना मंत्रालयात हेलपाटे घालावे लागु नये यासाठी Online Application प्रणाली सुरु केली. (आता E-Mail व्दारे अर्ज स्विकारले जातात).
२) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये रुग्णालय अंगीकृत (Hospital Empanelment) प्रक्रिया तसेच या योजनेअंतर्गत रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपुर्णतः निःशुल्क/मोफत असल्याची जनजागृती केली.
३) ना वशिला, ना ओळख, थेट मिळते मदत हे ब्रिद वाक्य करुन हा कक्ष लोकाभिमुख बनवला.
४) या योजनेच्या नावाखाली गरजू रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या दलालांची साखळी तोडण्यास आमच्या टीमला यश मिळाले. अशा आढळून आलेल्या अपप्रवृत्तीवर छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करुन उचित पोलीस कार्यवाही करण्यात आली.

गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ऑनलाईन, पूर्णतः निःशुल्क आणि पारदर्शक केल्याने आता ही केवळ एक योजना राहिली नसून, ती लोकचळवळ करण्यात मला व आमच्या सर्व सहकाऱ्यांना यश आले होते. हे वास्तव आहे. योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याला मंत्रालयात नव्हे तर गावपातळीवरील रुग्णसेवकाशी केवळ संपर्क करावा लागत होता, ही सर्वात मोठी उपलब्धी मला माझ्या काळात करता आली, याचा मनोमन आनंद आहे.

माझ्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या निकषातील आजारांची संख्या वाढवणे, निधीची/मदतीची मर्यादा वाढवणे, उत्पन्नमर्यादेची अट शिथील करणे, योजनेच्या लाभासाठी सुलभता आणण्यासाठी प्रक्रिया ऑनलाईन करणे, यांसारखे बदल करण्यात मला यश आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अडीच वर्षात तब्बल ५१ हजार पेक्षा अधिक रुग्णांना ४१९ कोटी रुपयांची मदत वितरीत करता येणे, हे केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील हजारो निःस्वार्थ रुग्णसेवकांचे यश आहे.
माझ्यातील रुग्णसेवक कालही जिवंत होता, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत असेल ही ग्वाही पत्राच्या उत्तरार्धात विनम्रपणे मी आपणाला देतो. रूग्णसेवेचा हा पवित्र यज्ञ यापुढील काळात संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. खा. डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे आणि अविरतपणे सुरूच राहणार आहे. माझ्यासाठी पद महत्वाचे नसून वरिष्ठांच्या आशिर्वादाने माझ्या हातून घडणारी सेवा, ही माझ्या कार्याची प्राथमिकता असणार आहे. येणाऱ्या काळात काल जशी आरोग्यसंकट काळात हक्काने आठवण काढत होता, त्याचप्रमाणे पुढील काळात देखील मी तुमच्यासोबत कायम असेल हे अभिवचन यानिमित्ताने देतो. तुम्हा सर्वांच्या प्रेमापुढे मी अविरत नतमस्तक आहे. दरम्यानच्या काळात मदतीसाठी प्रत्यक्ष किंवा दुरध्वनीद्वारे आलेल्या रूग्णांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत; परंतु तांत्रिक कारणामुळे अथवा शासकीय नियमावलीमुळे कोणास मदत मिळू शकली नसल्यास मनःपूर्वक दिलगीरी व्यक्त करतो.

Web Title: Cm devendra fadnavis appointed rameshwar naik head of mukhyamantri vaidyakiy sahayyata kaksha replace eknath shinde favor mangeshc chivate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 07:37 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Cm Eknath Shinde

संबंधित बातम्या

Maratha Reservation: “काय उचकायचं ते उचका, मी त्यांना…”; जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर
1

Maratha Reservation: “काय उचकायचं ते उचका, मी त्यांना…”; जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis: “शहरी विकास आराखडा राबविताना पुढील…”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis: “शहरी विकास आराखडा राबविताना पुढील…”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Maratha Reservation: बावनकुळे जरांगे पाटलांवर संतापले; म्हणाले, “सरकार उलथवून टाकण्याची जी भाषा सुरू…”
3

Maratha Reservation: बावनकुळे जरांगे पाटलांवर संतापले; म्हणाले, “सरकार उलथवून टाकण्याची जी भाषा सुरू…”

Maratha Reservation: आरक्षणाचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांचे OSD जरांगे-पाटलांच्या भेटीला, मोठ्या निर्णयाची शक्यता
4

Maratha Reservation: आरक्षणाचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांचे OSD जरांगे-पाटलांच्या भेटीला, मोठ्या निर्णयाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.