Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे खासदार निलेश लंकेकडून स्वागत, विखे पिता-पुत्रांवर केली टीका

सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घातल्याबद्दल खासदार निलेश लंकेनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी विखे पिता-पुत्रांवर टीका देखील केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 10, 2026 | 08:03 PM
सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे खासदार निलेश लंकेकडून स्वागत

सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे खासदार निलेश लंकेकडून स्वागत

Follow Us
Close
Follow Us:
  • मुख्यमंत्र्यांकडून सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश
  • खासदार निलेश लंकेनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
  • विखे पिता-पुत्रांवर लंकेनी केली टीका
सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे खासदार निलेश लंके यांनी स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. पत्रकारांशी बोलताना खासदार लंके म्हणाले की, सिस्पे घोटाळ्यात सर्वसामान्य नागरिकांचे कष्टाचे पैसे अडकले असून अनेकांनी थोड्या नफ्याच्या आशेने आपली आयुष्यभराची पुंजी गुंतवली होती. मात्र या घोटाळ्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. काही दुर्दैवी ठेवीदारांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असून दोषींना अटक करून त्यांच्या कडून ठेवीदारांचे पैसे वसूल करून ते सर्वसामान्य नागरिकांना परत मिळाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

Ahilyanagar News: १७ हजारांहून अधिक लाडक्या बहिणींना वगळले! महायुती सरकारबाबत महिलांमध्ये नाराजी

ठेवीदारांचा प्रश्न राजकारणापलीकडे – खासदार निलेश लंके

सिस्पे घोटाळा उघडकीस आल्यानंतर आपण काही ठेवीदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती, असे सांगत खासदार लंके म्हणाले की, हा विषय कधीही राजकीय न करता केवळ ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देणे हीच आपली भूमिका राहिली आहे. मात्र विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात असून राजकीय आकसापोटी आपल्यावर बोट दाखवले जात आहे. स्वतःचे दोष झाकून ठेवून दुसऱ्यांवर आरोप करण्याची सवय काही लोकांना असल्याची टीका करत त्यांनी नाव न घेता विखे पाटलांवर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, सिस्पे प्रकरण अतिशय गंभीर आहे. मात्र जेव्हा केंद्रीय मंत्री लोणी किंवा कोपरगावच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा त्यांना सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवेदन का दिले जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

रस्ते घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांचे मौन

नगर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्ते घोटाळ्यावर एक शब्दही न बोलल्याची टीका खासदार लंके यांनी केली. जिल्ह्यात दहा लाखांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस आले असून या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

तसेच ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने शिर्डीसह इतर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली असून सुमारे 300 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. याशिवाय शेवगाव येथे शेअर मार्केटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून या दोन्ही प्रकरणांची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. पोलिसांवरच नागरिकांचा विश्वास नसेल, तर सर्वसामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिरपे-इन्फिनिटी घोटाळ्याशी कोणताही संबंध नाही

शिरपे-इन्फिनिटी घोटाळ्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे खासदार लंके यांनी ठामपणे स्पष्ट केले. केवळ इन्फिनिटीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिलो म्हणून जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून हा राजकीय हेतूने चालवलेला खोटा प्रचार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या उद्घाटन कार्यक्रमाला विविध पक्षांचे आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून दबावतंत्राचा आरोप

आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांनी कोणालाही पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त केलेले नसून उलट ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जाणीवपूर्वक दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप करत काही ठिकाणी धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीचा विचार महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असून नगर शहराने शांतता, विकास आणि पारदर्शक प्रशासनासाठी या विचारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही खासदार निलेश लंके यांनी केले.

Web Title: Cm devendra fadnavis instructed inquiry for cispe scam member of parliament nilesh lanke thanked chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • CM Devendra Fadnavis
  • Nilesh Lanke

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: १७ हजारांहून अधिक लाडक्या बहिणींना वगळले! महायुती सरकारबाबत महिलांमध्ये नाराजी
1

Ahilyanagar News: १७ हजारांहून अधिक लाडक्या बहिणींना वगळले! महायुती सरकारबाबत महिलांमध्ये नाराजी

Maharashtra Politics: ‘लाडकी बहीण योजने’वर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले; म्हणाले, “देवाभाऊ आहे तोवर…”
2

Maharashtra Politics: ‘लाडकी बहीण योजने’वर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले; म्हणाले, “देवाभाऊ आहे तोवर…”

Ahilyangar News: शेतकरी पुन्हा अडचणीत! रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ
3

Ahilyangar News: शेतकरी पुन्हा अडचणीत! रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ

“नामांतरानंतर पहिला महापौर भाजपा–राष्ट्रवादी युतीचा करा; 1 महिन्यात ‘हा’ प्रस्ताव मंजूर होईल,” मुख्यमंत्र्यांचे आवाहन
4

“नामांतरानंतर पहिला महापौर भाजपा–राष्ट्रवादी युतीचा करा; 1 महिन्यात ‘हा’ प्रस्ताव मंजूर होईल,” मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.