Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: Devendra Fadnavis: ‘या’ जिल्ह्याला विकसित करण्यासाठी मदत करावी; फडणवीसांनी घेतली PM मोदींची भेट’

PM Narendra Modi: वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2025 | 10:45 PM
Devendra Fadnavis: Devendra Fadnavis: ‘या’ जिल्ह्याला विकसित करण्यासाठी मदत करावी; फडणवीसांनी घेतली PM मोदींची भेट’
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली. यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना १५ व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट; राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या… https://t.co/Bk5GAhHgFH

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 13, 2025

 

वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. १ ते ४ मे या कालावधीत मुंबईत ही समिट होणार आहे. याचनिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) सुद्धा स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार निधी देणार आहे, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

नक्षलवादाविरोधात ‘देवाभाऊ’ ॲक्शन मोडमध्ये

राज्यात मागील वर्षी विधानसभा निवडणूक पार पडली. राज्यात जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. खातेवाटप झाले. मात्र पालकमंत्रीपदाचे वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजकीय नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु होती. शेवटी हा तिढा राज्य सरकारने सोडवला आहे. राज्यातील फडणवीस सरकारने अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. पालकमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांची देखील इच्छा पूर्ण झालेली पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis: नक्षलवादाविरोधात ‘देवाभाऊ’ ॲक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्री फडणवीसांची ‘ती’ इच्छा अखेर पूर्ण

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना पालकमंत्रिपदाच्या वाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री हवे असल्याचा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. ‘खरंतर मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेत नसतात. पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी माझी इच्छा आहे. अर्थात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तरच घेईन’, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

 

Web Title: Cm devendra fadnavis meet pm narendra modi for nagpur development and gadchiroli airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Gadchiroli
  • Nagpur
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Who is Next PM: कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? ‘या’ नावांना मिळाली सर्वाधिक पसंती; व्हाल थक्क
1

Who is Next PM: कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? ‘या’ नावांना मिळाली सर्वाधिक पसंती; व्हाल थक्क

राजधर्माचे पालन करा अन् तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करा, दिल्लीतून…; काँग्रेसची सरकारकडे मागणी
2

राजधर्माचे पालन करा अन् तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करा, दिल्लीतून…; काँग्रेसची सरकारकडे मागणी

BJP National President: कोण होणार  राष्ट्रीय अध्यक्ष? RSS ची ‘या’ नावाला पसंती? मोदी-भागवत भेटीत निर्णयाची शक्यता
3

BJP National President: कोण होणार राष्ट्रीय अध्यक्ष? RSS ची ‘या’ नावाला पसंती? मोदी-भागवत भेटीत निर्णयाची शक्यता

ट्रम्पच्या ‘या’ दोन चुकांमुळे भारत-चीन आले जवळ; जिनपिंग यांनी भारताला लिहिलेल्या पत्रातील ‘गुपिते’ आली समोर
4

ट्रम्पच्या ‘या’ दोन चुकांमुळे भारत-चीन आले जवळ; जिनपिंग यांनी भारताला लिहिलेल्या पत्रातील ‘गुपिते’ आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.