मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंशी युतीबाबत केलं मोठं विधान; म्हणाले, 'उद्धव ठाकरेंशी पुन्हा युती...' (फोटो- ट्विटर)
Maharashtra Guardian Minister List: राज्यात मागील वर्षी विधानसभा निवडणूक पार पडली. राज्यात जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. खातेवाटप झाले. मात्र पालकमंत्रीपदाचे वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजकीय नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु होती. शेवटी हा तिढा राज्य सरकारने सोडवला आहे. राज्यातील फडणवीस सरकारने अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. पालकमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांची देखील इच्छा पूर्ण झालेली पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना पालकमंत्रिपदाच्या वाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री हवे असल्याचा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. ‘खरंतर मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेत नसतात. पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी माझी इच्छा आहे. अर्थात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तरच घेईन’, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
अखेर आज महाराष्ट्र सरकारने आज पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली आहे. अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गडचिरोली जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत, अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी फडणवीस सरकार काम करत आहेत. त्यामुळे फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने येत्या काळामध्ये विकासाचे अनेक प्रकल्प गडचिरोलीमध्ये पाहायला मिळू शकणार आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पालकमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात येत्या काळात नक्षलवादाविरोधातील लढाई अजून कठोर झालेली पहायला मिळणार आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा ‘या’ भागात धावली लाल परी
राज्यातील प्रत्येकाला शासनाची एसटीबस ही प्रिय आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी परिवहन विभागाची एसटी बस आपल्याला मदत करत असते. एखाद्या गावात बससेवा सुरू झाल्यानंतर तीचे स्वागत देखील मोठ्या आनंदाने केले जाते. मात्र आज गडचिरोलीमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आज गडचिरोलीमधील 15 गावांना बससेवा मिळाली आहे. गरदेवाडा ते वांगेतुरी दरम्यानच्या 15 गावांमध्ये बससेवा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.
नक्षवाद्यांना मुख्य प्रवाहात आणलं..; गडचिरोली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
काही महिन्यांपूर्वी गडचिरोलीतील काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. अशा बंदुक आणि बॉम्बचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या या नक्षलवाद्यांच्या जीवनात गडचिरोली पोलिसांनी आशेचा एक नवीन किरण आणला आहे. गडचिरोली पोलिसांनी जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स उद्योगात विविध पदांवर एकूण 48 आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना नोकरी दिली आहे.
हेही वाचा: Gadchiroli Police: नक्षवाद्यांना मुख्य प्रवाहात आणलं..; गडचिरोली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
गडचिरोलीचे एसपी निलोप्तल म्हणाले की, आतापर्यंत गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या 600 पेक्षा जास्त आहे. 2014 मध्ये आत्मसमर्पण धोरणात बदल झाल्यानंतर, सरकार आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत, सरकार आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी काही रक्कम आणि जमीन प्रदान करते.
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर; कोणता नेता कोणता जिल्हा सांभाळणार?