CM Devendra Fadnavis reprimands for creating chaos during Manmohan Singh condolence in budget session
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. महायुती सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे सर्वांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र पहिल्या दिवसापासून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. अर्थमंत्री अजित पवार हे येत्या 10 मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी अजित पवार गटाच्या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी गदारोळ घातला आहे.
अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे बीड हत्या प्रकरणामुळे अडचणींमध्ये आले आहेत. तर कृषीमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली होती. यामुळे अजित पवार गटाचे दोन्ही विद्यमान आमदार हे अडचणींमध्ये आले आहेत. विरोधकांनी दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. यामुळे विरोधकांनी विधीमंडळामध्ये गदारोळ करण्यास सुरुवात केली. मात्र यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र यावेळी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिक घेतली. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी विरोधक गोंधळ घालत होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे योग्य नसल्याचे म्हणत शोक प्रस्तावा वेळी असा गोंधळ घालणे योग्य नसल्याचे म्हणाले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं. “देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारण केल्या अशा मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं. तथापी माननीय विरोधी पक्ष नेत्याला एवढच सांगू इच्छितो की, आपण मंत्रिमहोदयासंदर्भात जे मांडत आहात. त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे. क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेली आहे. कोर्टाची ऑर्डर आल्यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावावेळी विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री कोट्यातून कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना कमी दरात घरं उपलब्ध दिली जातात. त्यासाठी नागरिकांना त्यांच्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचं प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ॲड. याच योजनेतून माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 मध्ये सदनिका मिळवली होती. आवश्यक कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे तर, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन(कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिक कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून चार जणांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.