Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Tech Week: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासन एआयचा विविध विभागांमध्ये वापर करीत आहे. एआयच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत आहे. शासन या परिवर्तनात सर्वात मोठा भागधारक म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहे, असे फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2026 | 02:35 AM
Mumbai Tech Week: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Follow Us
Follow Us:

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर – फडणवीस
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे २९ व ३० मे रोजी आयोजन
दहा हजारांहून अधिक डेव्हलपर्स आणि तंत्रज्ञानप्रेमींची उपस्थिती अपेक्षित

मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एआय स्वीकारण्याची आवश्यकता आहे. ‘मुंबई टेक वीक’सारख्या उपक्रमांमुळे एआयमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुंबई टेक वीक (MTW) २०२६’ ची घोषणा केली. यावेळी ते बोलत होते. टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम) तर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, आयडीएफसी बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम दि. २९ आणि ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. ‘इंडिया : आय इन एक्शन’ या थीमअंतर्गत आयोजित ‘मुंबई टेक वीक २०२६’ मध्ये विविध क्षेत्रांतील एआयच्या प्रत्यक्ष वापराचे सादरीकरण होणार असून मेटा, एंथ्रॉपिक, ओपन एआय, गुगल क्लाऊड आणि नेसा यासारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. यावेळी ‘मुंबई टेक वीक’ लोगोचे अनावरण करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासन एआयचा विविध विभागांमध्ये वापर करीत आहे. एआयच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत आहे. शासन या परिवर्तनात सर्वात मोठा भागधारक म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहे. ‘मुंबई टेक वीक’सारख्या व्यासपीठांमुळे एआयसंदर्भातील अनुभव लोकांपर्यंत अधिक व्यापक पातळीवर पोहोचतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी या कार्यक्रमात शासनाच्या एआय उपक्रमांचे अनुभवात्मक सादरीकरण करण्याची सूचनाही केली.

“महाराष्ट्र व दक्षिण कोरियात झालेल्या सामंजस्य…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केले मत

टीमच्या वाढत्या विस्ताराचे कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अधिकाधिक तरुण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक या उपक्रमाशी जोडले जात आहेत, ही सकारात्मक बाब आहे. महाराष्ट्र शासन एआय क्षेत्रातील नवोन्मेष आणि उद्योगवृद्धीसाठी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे. गेल्या वर्षापेक्षा अधिक भव्य आणि प्रभावी मुंबई टेक वीक आयोजित करूया आणि महाराष्ट्रातील युवकांना एआय क्षेत्रातील नव्या संधींशी जोडून त्यांना जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध असेल.

“पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

‘मुंबई टेक वीक’बाबत टीमचे सह अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्य हर्ष जैन म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य आणि ‘मुंबई टेक वीक’च्या संकल्पनेवरील त्यांच्या विश्वासाबद्दल आम्ही आभारी आहोत. एमटीयू २०२६ हे केवळ चर्चांपुरते मर्यादित न राहता उद्योगांचे स्वरूप कसे बदलत आहे आणि प्रत्यक्ष आर्थिक संधी कशा निर्माण करत आहे, हे दाखवण्यासाठी तयार करण्यात आले आहे आणि म्हणूनच मुंबई हे त्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्र शासन आमचा भागीदार असल्याने, मुंबई आणि महाराष्ट्राच्या एआय अर्थव्यवस्थेसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरवण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.

Web Title: Cm devendra fadnavis said maharashtra leads in the field of artificial intelligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • CM Devendra Fadnavis
  • Tech News

संबंधित बातम्या

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…
1

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

Russia Ukraine War :युक्रेनचा रशियाच्या AI डेटा सेंटरवर ड्रोन हल्ला
2

Russia Ukraine War :युक्रेनचा रशियाच्या AI डेटा सेंटरवर ड्रोन हल्ला

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
3

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
4

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.