Maharashtra Election Result 2024: "ज्याच्या सर्वात जास्त जागा येतील..."; एकनाथ शिंदेंचे CM पदाबाबत सूचक विधान
Maharashtra Assembly Result 2024 Live: विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे. सध्या समोर येत असलेल्या कलांनुसार, भाजप आणि महायुती ही आघाडीवर आहे. मीडिया रिपोर्टनुसार महायुती ही तब्बल 217 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान महायुतीने राज्यात अभूतपूर्व असे यश प्राप्त केले आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महायुतीने प्राप्त केलेल्या अभूतपूर्व विजयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यातील तमाम मतदारांना मी धन्यवाद देतो. राज्यात महायुतीला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. लाडक्या बहिणी, लाडकया शेतकऱ्यांनी आणि समाजातील प्रत्येक घटकाने भरभरून मतदान केले आहे. गेले दोन ते अडीच वर्षे सरकारने महायुतीने जो विकास केला, जनतेचे आभार मानतो.”
#Live l 23-11-2024 📍ठाणे
📡 पत्रकारांशी संवाद – लाईव्ह
https://t.co/vKtJsmHPdE— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 23, 2024
मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्याच्या सर्वात जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे काही ठरलेले नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत एकत्रितपणे बसून आम्ही निर्णय घेऊ.” सध्या 288 जागांपैकी महायुती 217 जागांवर पुढे आहे. त्यामध्ये भाजप 126 जागांवर, शिवसेना 57 जागांवर आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस 37 जागांवर पुढे आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदे यांची शिवसेना राज्यात सरस ठरलेली दिसून आहे.
काय म्हणाले विनोद तावडे?
‘महाराष्ट्र च्या जनतेने महायुतीला जो प्रचंड विजय दिलाय त्याबद्दल जनतेचे आभार. हा जो विजय झलाय तो मोदींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार आठवले या सर्वांनी एकत्र काम केलं. विकास कामे, लाडकी बहीण सारख्या योजना यामुळेच जनतेला विश्वास बसला’ असं विनोद तावडे म्हणाले. महायुतीला मिळालेल्या यशानंतर त्यांनी काही मुद्दे मांडत मविआसंदर्भात लक्षवेधी वक्तव्य केलं. ‘नैसर्गिक युती पवारांनी ठाकरेंनी तोडली तो राग होता. रोज सकाळी राजकारण कलुषित करण्याचं वक्तव्य यायचं त्यामुळे बाळासाहेबांचा शिवसैनिक नाराज होता’, असं ते म्हणाले.
नागपूरमध्ये विजयी गुलाल फडणवीसांचा
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. देवेंद्र फडणवीस हे आता दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना 35,755 मत पडली आहेत. तर त्यांच्यासमोर असणाऱ्या कॉंग्रेस उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना 23, 426 मतं पडली आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा तब्बल 12 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे.