Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक रणधुमाळीला वेग ! नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजप पक्षश्रेष्ठींच्या सभा

नांदेड महापालिका निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजप पक्षश्रेष्ठींसह स्टार प्रचारकांची फौज नांदेडमध्ये जमा झाली आहे. यामुळे राजकारण रंगले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 04, 2026 | 03:56 PM
CM Fadnavis Ravindra Chavan, Pankaja Munde BJP star campaigners rally for Nanded elections

CM Fadnavis Ravindra Chavan, Pankaja Munde BJP star campaigners rally for Nanded elections

Follow Us
Close
Follow Us:

Nanded Politics :  नांदेड : मनपा निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असताना भारतीय जनता पक्षाने प्रचाराची धार अधिक तीव्र केली आहे. भाजपच्या वतीने राज्यातील दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांचा धडाका सुरू होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरणमंत्री तथा मनपा निवडणूक प्रभारी पंकजा मुंडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नांदेडच्या प्रचार मैदानात उतरणार आहेत. भाजपाचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी अॅड. चैतन्यबापू देशमुख, जिल्हा प्रवक्ते निलेश देशमुख, संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती. अमरनाथ राजूरकर यांनी सांगितले की, ४ जानेवारी रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभा नांदेड शहरात विविध ठिकाणी होणार आहेत. आयोजित करण्यात आल्या आहेत. याच दिवशी आपटीआय समोरील भाजपाच्या केंद्रीय प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. तर ५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदिरा गांधी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. मनपा निवडणुकीसाठी भाजपाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती. एकूण ५५० इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज सादर केले होते. त्यातून सर्वेक्षण, स्थानिक परिस्थितीचा अभ्यास आणि मुलाखतींच्या माध्यमातून सक्षम व विजयी उमेदवारांची निवड करण्यात आली. ६७ उमेदवारांना भाजपाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक रिंगणात उत्तरवण्यात आले आहे. आज ४ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत बूथ कमिटी अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख आणउमेदवारांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रचाराची अंतिम रणनीती, बूथ मैनेजमेंट आणि मतदार संपर्काबाबत दिशा दिली जाणार आहे.

हे देखील वाचा : देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू…”; उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा

भाजपाच्या स्टार प्रचारकांची फौज मैदानात

राजूरकर यांनी स्पष्ट केले की, प्रभाग क्रमांक ७, ११ आणि १८ मध्ये पक्षाला अपेक्षेप्रमाणे प्रबळ उमेदवार मिळाले नाहीत. तसेच स्थानिक राजकीय परिस्थिती पक्षासाठी अनुकूल नसल्यामुळे त्या ठिकाणी उमेदवार देता आले नाहीत. मात्र उर्वरित प्रभागांमध्ये भाजपाची संघटनात्मक ताकद भक्कम असून, त्याचा थेट फायदा निवडणूक निकालात दिसून येईल, असा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षांवर टीका करताना राजुरकर म्हणाले की, “विरोधक फेक नरेटिव्ह सेट करून आम्हीच विकास केला, असा खोटा प्रचार करत आहेत. महायुतीच्या काळात झालेल्या विकासकामांचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र नांदेडची जनता हुशार असून, खरा विकास कोणी केला हे ती ओळखते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मित्रपक्षांच्या भूमिकेवरही, त्यांनी बोट ठेवले, शिंद शिवसेनेने नांदड दक्षिणमध्ये राष्ट्रवादीशी युती केली असून, नांदेड उत्तरमध्ये स्वबळावर लहण्याचा निर्णय घेतला आहे. या दुहेरी भूमिकेमुळे शिवसेनेची संभ्रमावस्था वाढलेली दिसून येते. काँग्रेसची अवस्था बिकट झाल्याचे सांगत, भाजपाच एकसंघपणे आणि आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

हे देखील वाचा : बंडखोरांना शिवसेनेचा दणका; विरोधात अर्ज भरणाऱ्या 26 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

महानगरपालिकेत युतीसाठी भाजपाने प्रामाणिक प्रयत्न केले, तीन वेळा जागावाटपाबाबत चचर्चा झाली भाजपाने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मात्र शिवसेनेने तशी प्रक्रिया राबवली नाही, असेही राजूरकर महणाले, “महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल आणि भाजपाचा महापौर होईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच, स्टार प्रचारकांच्या सभांमुळे भाजपाच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून, नांदेड मनपा निवडणुकीत भाजपाची आक्रमक, संघटित आणि आत्मविश्वासपूर्ण मोहीम आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी फौज प्रचारासाठी मैदानात उतरविली असून प्रभागा प्रभागात प्रचाराचे नारळ आज मान्यवरांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात फोडण्यात आले आहेत.

Web Title: Cm fadnavis ravindra chavan pankaja munde bjp star campaigners rally for nanded elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला
1

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Pune News : उमेदवारांनो ‘हा’ फॉर्म्युला वापरा अन् विजयी व्हा! अजित पवारांचा पुणे पॅटर्न; विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र
2

Pune News : उमेदवारांनो ‘हा’ फॉर्म्युला वापरा अन् विजयी व्हा! अजित पवारांचा पुणे पॅटर्न; विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ
3

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ

Santosh Dhuri in BJP : राज साहेबांची हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती…! कमळ हाती घेताच संतोष धुरींनी केली आगपाखड
4

Santosh Dhuri in BJP : राज साहेबांची हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती…! कमळ हाती घेताच संतोष धुरींनी केली आगपाखड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.