ठाकरे बंधूंनी शिवशक्ती वचननामा प्रसिद्ध करुन उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शिवशक्तीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल नार्वेकर यांनी कुलाबामधील विरोधी इच्छुक उमेदवारांना धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “राहुल नार्वेकर हे सभागृहात सभापती. बाहेर आमदार आहे. नाव घेऊन बोलतो. एक आमदार दमदाटी करतो. समोरच्याचं संरक्षण काढून घेऊन दमदाटी करत आहे. अध्यक्षाची निलंबन करा. अध्यक्ष निष्पक्षपाती असतात. ते कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ नये असा हा अलखित दंडक आहे. त्यांनी त्याला छेद देणारं वर्तन केलं आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांवर निशाणा साधला.
हे देखील वाचा : बंडखोरांना शिवसेनेचा दणका; विरोधात अर्ज भरणाऱ्या 26 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
पुढे ते म्हणाले की, “देशात झुंड शाही सुरू आहे. आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाली आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडली. आता त्यांनी उमेदवारांची पळवापळवी सुरू केली आहे. साम दाम दंड भेद करुन निवडणूक जिंकायची. निगरगट्ट राज्यकर्ते लाभले आहेत. बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजकीय नेत्यांसह निवडणूक आयोगावर देखील जोरदार हल्लाबोल केला.
हे देखील वाचा : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा
उद्धव ठाकरे म्हणाले की, “विश्वास ठेवायचा तरी कुणावर. निवडणूक आयोगावर दम असेल तर त्यांनी निवडणूक रद्द करावी. आरओ होते त्यांचे फोन रेकॉर्ड काढा. की तेही रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज सारखं डीलिट केलं का. बिनविरोध निवडणुका कशा होतात. हे निवडणूक आयोगाचं नाटक आहे. त्यांनी निकाल राखून ठेवला. पुन्हा निकाल तोच जाहीर करतील.त्यांच्यात हिम्मत असेल तर निवडणूक रद्द करा. जेनझीचा मतदानाचा अधिकार काढून घेतला आहे. केवळ निवडणूक निकाल रोखू नका. तुम्ही तिथल्या निवडणुका रद्द करा. नाही तर तुम्ही गुलाम आहात हे लोकांमध्ये जाईल,” असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.






