Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : दहा दिवसाच्या चिमुकल्याला घेऊन मातेने दिली परीक्षा; पीपल्स कॉलेजमध्ये हृदयस्पर्शी घटना

पीपल्स महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एका आईने आपल्या दहा दिवसाच्या तान्हुल्या बाळाला घेऊन बुधवारी (दि १८) राज्यशास्त्राचा पेपर दिला. बाळ दोन दिवसांचे असताना तिने पेपर दिला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 20, 2026 | 06:36 PM
Nanded, Sheetal Chandrakat Chite took a 10-day-old baby and gave HSC paper

Nanded, Sheetal Chandrakat Chite took a 10-day-old baby and gave HSC paper

Follow Us
Follow Us:

Nanded News: नांदेड : राज्यामध्ये बोर्डाच्या परिक्षा सुरु झाल्या आहेत. मागील आठवड्यात बारावीच्या तर आजपासून दहावीच्या परिक्षा सुरु झाल्या आहेत. यामध्ये नांदेडमध्ये अत्यंत हृदयस्पर्शी घटना घडली आहे. विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला (HSC Exam) मंगळवारपासून (दि.१०) सुरुवात झाली आहे. नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षा शांततेत व सुरळीत सुरू आहे. केंद्रावर एकूण ८६१ परीक्षार्थी आहेत. प्रशासनाच्या वतीने परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात येत आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके बैठकी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्र परिसरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष उपाययोजना केल्या असून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. (Nanded News)

श्री बसवेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी

पीपल्स महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एका आईने आपल्या दहा दिवसाच्या तान्हुल्या बाळाला घेऊन बुधवारी (दि १८) राज्यशास्त्राचा पेपर दिला. बाळ दोन दिवसांचे असताना ती आपल्या बाळाला घेऊन बहिणीसोबत पीपल्स महाविद्यालय परीक्षा केंद्रावर पोहचली होती.
तिची शिक्षणाची धडपड पाहून पीपल्स महाविद्यालय परीक्षा केंद्राद्वारे मातृ स्नेही कक्षाची स्थापना केली व या कक्षात बाळासाठी झुल्याची व्यवस्था करण्यात आली. बाळाला झोळीत झोपवून ती आता पेपर देत आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे देखील वाचा : ९वी-१२वी शिक्षकांना TET सक्ती? सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून मागवला सविस्तर प्रतिज्ञापत्र

शितल चंद्रकात चिते (वय वर्षे २१) असे या मातेचे नाव आहे. नांदेड शहरातील श्री बसवेश्वर महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. पती ड्युटीला जात असल्याने बाळाचा सांभाळ करायला घरी कुणीच नाही. दुसरीकडे, बारावी बोर्ड पेपरही महत्त्वाचा आहे. आईची माया आणि तिला शिक्षणाची असणारी गोडी पाहून परीक्षा केंद्रावर उपस्थित भारावून गेले. शितल चित्ते नांदेड येथील रहिवासी आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे. तिने बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 

हे देखील वाचा : आता शिळफाट्याची वाहतूक कोंडी फुटणार! मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा

केंद्राचे केले कौतुक

घरचेही तिला साथ देत प्रोत्साहन देतात. परीक्षा केंद्राला शिक्षणाधिकारी माधव सलगर, डायटचे प्राचार्य डॉ अमोल निळेकर, गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांनी भेटी दिल्या असून परीक्षा केंद्रावरील परीक्षेचा आढावा घेऊन झूम वेबकास्टिंग व सीसीटीव्ही नियंत्रणाखाली परीक्षा शिस्तबद्ध व शांततेत सुरू असल्याचे समाधान करून कौतुक केले आहे. केंद्रप्रमुख प्रा विजय कदम, सह केंद्रप्रमुख प्रा.जी. डी. ताडोड, प्रा. विनोद चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून परीक्षा अत्यंत सुरळीत चालू आहे.

Web Title: Nanded sheetal chandrakat chite took a 10 day old baby and gave hsc paper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • hsc exam
  • nanded news

संबंधित बातम्या

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
1

दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी, न्यायालयीन परिसरातील वाद चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.