Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिकेचा शंभर दिवसांचा कसोटी सामना; महापौरांच्या कामावर नांदेड शहराचा सर्वांगीण विकास अवलंबून

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे यांच्याकडे सर्वांच्या अपेक्षा लागल्या आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि तक्रार निवारणावर असे अनेक मुद्दे समोर आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 22, 2026 | 04:34 PM
Nanded-Waghala Municipal Corporation Mayor Kavita Mule responsible for overall development city

Nanded-Waghala Municipal Corporation Mayor Kavita Mule responsible for overall development city

Follow Us
Close
Follow Us:

संतोष कुलकर्णी : नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत सत्तांतरानंतर शहराच्या अपेक्षा लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. महापौर कविता मुळे यांच्या नेतृत्त्वाखालील नव्या कारभारासाठी पुढील ३० आणि १०० दिवस हे केवळ औपचारिक टप्पे नसून, प्रत्यक्ष कामगिरीची कसोटी मानले जात आहेत. प्रारंभी पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि तक्रार निवारणावर भर देत प्रशासनाने सक्रियतेचे संकेत दिले आहेत. (Nanded News)

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा सुनिश्चित करणे ही सर्वांत मोठी जबाबदारी ठरत आहे. गळती दुरुस्ती ४८ तासांत पूर्ण करणे. जलवाहिन्याच्या कामाची माहिती सावजानक करणे आणि पाणीपुरवठ्याची नियमितता वाढवणे या बाबी तातडीच्या आहेत. पुढील ३० दिवसांत स्वच्छता तक्रारींमध्ये किमान १५ टक्के घट आणि कचरा संकलनाचे वेळापत्रक जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मालमत्ता कर व नळपट्टी वसुलीत किमान १० टक्के घट साध्य करणे महत्त्वाचे ठरेल.

हे देखील वाचा : निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सक्रियता परिणामात दिसण्याची अपेक्षा

त्यामुळे विकासकामांसाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. १०० दिवसांच्या आराखड्यात रस्ते दुरुस्ती, नालेसफाई, एलईडी स्ट्रीटलाइट, दवाखान्यांची कार्यक्षमता आणि मनपा शाळांचा दर्जा उंचावणे यांसारख्या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अपेक्षित आहे. डिजिटल प्रशासनालाही गती देणे आवश्यक असून जन्म-मृत्यू दाखले, बांधकाम परवाने आणि कर भरणा ऑनलाईन व वेळेत उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे. अर्ज प्रक्रियेचा कालावधी ५० टक्क्यांनी कमी झाला, तर ते मोठे यश ठरेल. अडथळे आणि निधीअभावी प्रशासकीय विलंब ही आव्हाने असली, तरी राजकीय स्थैर्य आणि समन्वयातून त्यांवर मात करावी लागणार आहे. पुढील शंभर दिवसांत सक्रियता प्रत्यक्ष परिणामांत दिसली, तर नांदेडच्या विकासाला नवी दिशा मिळेल; अन्यथा अपेक्षाभंग टाळता येणार नाही.

हे देखील वाचा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”

प्रभाग ९ मधील समस्या सोडवा

शहरातील नांदेड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. ९ मधील विविध नागरी समस्यांवर तत्पर कारवाई करण्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनासमवेत विशेष बैठक घेतली. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावून थेट चर्चा करण्यात आली आणि प्रलंबित प्रश्न आठ दिवसांत निकाली काढण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. बैठकीस नगरसेवक किशोर स्वामी, सदिच्छा सोनी पाटील, डॉ. मंजुषा रानवळकर व बलवंतसिंघ गाडीवाले उपस्थित होते. बांधकाम विभागाचे अभियंता सुमंत पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभागातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. काही ठिकाणी नियमित पाणीपुरवठाच होत नसल्याचेही निदर्शनास आले. यावर नगरसेवकांनी आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. तसेच ड्रेनेज लाईन ब्लॉकेज, फुटलेली चेंबर्स आणि रस्त्यावर साचणारे सांडपाणी याबाबत तातडीने दुरुस्ती करून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रभागात कोचिंग क्लासेस व विद्याथ्यर्थ्यांच्या हॉस्टेल्सची संख्या मोठी असल्याने वाहतूक व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे रबरी गतिरोधक बसविणे, नवीन पथदिवे उभारणे व बंद दिवे दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.

Web Title: Nanded waghala municipal corporation mayor kavita mule responsible for overall development city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • nanded news
  • Nanded Politics
  • political news

संबंधित बातम्या

Pune News : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा
1

Pune News : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा

Maharashtra News : पाटबंधारे उपविभागात काम बंद आंदोलन; वेतन त्रुटी व जुनी पेन्शनच्या मागणीसाठी दिले निवेदन
2

Maharashtra News : पाटबंधारे उपविभागात काम बंद आंदोलन; वेतन त्रुटी व जुनी पेन्शनच्या मागणीसाठी दिले निवेदन

‘Vai Vandana Card : ७० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ‘वय वंदना कार्ड’ मोहीम; नांदेडमध्ये स्त्युत्य उपक्रम
3

‘Vai Vandana Card : ७० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ‘वय वंदना कार्ड’ मोहीम; नांदेडमध्ये स्त्युत्य उपक्रम

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पडली वादाची ठिणगी? मनसे-शिवसेना वादावर संजय राऊतांचे सूचक विधान
4

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पडली वादाची ठिणगी? मनसे-शिवसेना वादावर संजय राऊतांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.