Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि बँडविड्थ…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते वर्षा निवासस्थानी इक्विनिक्स (Equinix) कंपनीच्या एमबी३ डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2026 | 02:35 AM
“प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि बँडविड्थ…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
Follow Us
Close
Follow Us:

इक्विनिक्स एमबी३ डेटा सेंटरचे उद्घाटन
प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी शासनासाठी उपयुक्त ठरणार
इक्विनिक्स ही जगातील सर्वात मोठी डेटा सेंटर

मुंबई: विविध शासकीय योजनांच्या ऑनलाईन अंमलबजावणीदरम्यान बँडविड्थची कमतरता ही मोठी अडचण ठरत होती. विशेषतः शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केल्यावर अचानक वाढणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकमुळे प्रणाली कोलमडण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत डेटा सेंटरमधील प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि तत्काळ बँडविड्थ वाढविण्याची क्षमता शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते वर्षा निवासस्थानी इक्विनिक्स (Equinix) कंपनीच्या एमबी३ डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी.अन्बळगन, मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच एपीएसी (APAC) चे अध्यक्ष सायरस अडग्रा, इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज पॉल, व्ही.पी. ग्रोथ अँड इमर्जिंग मार्केटचे मॅक्स पॅरी, आयबीएक्सचे वरिष्ठ संचालक गणेश पवार, पब्लिक पॉलिसी अँड गव्हर्नन्सच्या संचालक एलिजाबेथ हर्नांडेझ उपस्थित होते.

अवकाळीचा तडाखा! Maharashtra Government ने उघडली तिजोरी; शेतकऱ्यांना 128 कोटींची मदत जाहीर

इक्विनिक्स एमबी३ डेटा सेंटर

इक्विनिक्स ही जगातील सर्वात मोठी डेटा सेंटर आणि इंटरकनेक्शन सेवा देणारी कंपनी असून, ३६ देशांतील ७७ महानगरांमध्ये २८० डेटा सेंटर्सचे जाळे कंपनीकडे आहे. भारतातील इक्विनिक्सचे पूर्णतः स्वतःच्या मालकीचे आणि नव्याने उभारलेले एमबी3 हे पहिले डेटा सेंटर आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३.७ एकर जागेवर उभारणी करण्यात आली असून, एकूण गुंतवणूक सुमारे ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे ६,००० कोटी रुपये) इतकी आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे ४,२०० हून अधिक कॅबिनेट्सची क्षमता उपलब्ध होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

एमबी३ डेटा सेंटर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सेवांसाठी सक्षम आहे. तसेच, हायब्रिड मल्टी-क्लाउड इंटरकनेक्शन सुविधेद्वारे जगभरातील इक्विनिक्सच्या डेटा सेंटर्सशी तसेच ११ हजाराहून अधिक ग्राहकांशी जोडणी शक्य होणार आहे. ऊर्जा शाश्वततेच्या दृष्टीने यवतमाळ येथे उभारण्यात आलेल्या २६.६ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून या डेटा सेंटरसाठी आवश्यक ऊर्जेचा मोठा भाग उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या मुंबईतील इक्विनिक्स डेटा सेंटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या उर्जेपैकी सुमारे ६० टक्के ऊर्जा या सौर प्रकल्पातून मिळते.

Web Title: Cm fadnavis said advanced interconnectivity and capacity to increase bandwidth beneficial maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • internet
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

अवकाळीचा तडाखा! Maharashtra Government ने उघडली तिजोरी; शेतकऱ्यांना 128 कोटींची मदत जाहीर
1

अवकाळीचा तडाखा! Maharashtra Government ने उघडली तिजोरी; शेतकऱ्यांना 128 कोटींची मदत जाहीर

CM Devendra Fadnavis : भोंदू खरातची आता ED चौकशी होणार ! देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2

CM Devendra Fadnavis : भोंदू खरातची आता ED चौकशी होणार ! देवेंद्र फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्रात स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न होणार साकार; सरकारने रेडी रेकनर दर ठेवले स्थिर
3

महाराष्ट्रात स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न होणार साकार; सरकारने रेडी रेकनर दर ठेवले स्थिर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
4

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.