Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Ajit Pawar : अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक! 500 कोटींच्या ऑडिओवरून भाजप-शिंदेगटात वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीची नवी खेळी

NCP Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आता राष्ट्रवादीने हे खातं परत मिळवण्यासाठी जोर लावला असून, छगन भुजबळांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 25, 2026 | 02:02 PM
NCP wants finance ministry (1)

NCP wants finance ministry (1)

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेस अर्थखात्यासाठी आक्रमक
  • भुजबळांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट
  • हिवाळी अधिवेशनापूर्वी खाते मिळण्याची राष्ट्रवादीला आशा
 

मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकाच खळबळ उडाली आहे. त्यातही महायुतीमधील मित्रपक्षच आपापसांत भिडू लागले आहेत. 500 कोटीच्या ऑडिओ क्लीपनंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील धुसफूस बाहेर पडताना दिसत असून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीकाटिपण्या करू लागली आहे. अश्यातच भाजपची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता राष्ट्र्वादी अजित पवार गटानेही भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. (NCP Ajit Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याजवळील अर्थमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले होते. याबाबतच आता राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला असून अर्थखातं परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे.

अर्थखाते आमचं हक्काचं – भुजबळ

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता अर्थखातंही राष्ट्रवादीकडे परत यावं, अशी पक्षाची भूमिका असल्याचं समोर आलं आहे.

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सुनेत्रा पवार या आमच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थखातं आम्हाला परत मिळायला हवं, असं त्यांनी सांगितलं. हे खातं आमचं हक्काचं असून, ते परत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याचंही भुजबळ म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाआधी निर्णय होणार?

अर्थखात्याच्या मागणीवर बोलताना भुजबळांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिल्याचा दावा केला. त्यामुळे या विषयावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तसंच, काँग्रेससोबत असतानाही खातेवाटपात अशा प्रकारचे बदल झाले होते आणि एका खात्याऐवजी दुसरं खातं मिळाल्याची उदाहरणं असल्याचं त्यांनी सांगितलं. हिवाळी अधिवेशनापूर्वी अर्थखात्याबाबत निर्णय होऊ शकतो, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र, विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. इतर खात्यांची अदलाबदल होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

आता राष्ट्रवादीच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार की फडणवीस हे खातं स्वतःकडेच ठेवणार, याचं उत्तर आगामी काळात स्पष्ट होईल.

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’

💡

Frequently Asked Questions

  • Que: राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थखात्याची मागणी का केली आहे?

    Ans: अजित पवार यांच्याकडे पूर्वी अर्थखातं होतं. त्यांच्या निधनानंतर हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आता हे खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे देण्यात यावं, अशी पक्षाची मागणी असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

  • Que: छगन भुजबळ यांनी अर्थखात्याबाबत काय विधान केलं?

    Ans: अर्थखातं हे राष्ट्रवादीचं हक्काचं खातं असून, ते परत मिळायला हवं, असं भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याचं सांगत त्यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची आशा व्यक्त केली.

  • Que: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण होणार आहे का?

    Ans: विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Ncp ajit pawar party demands finance ministry chhagan bhujbal devendra fadnavis vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • CM Devendra Fadnavis
  • Mahayuti
  • NCP Party

संबंधित बातम्या

Manoj Jarange Audio Clip Row : ‘500 कोटी म्हणजे पारावरच्या गप्पा!’ छगन भुजबळांचा जरांगेच्या ऑडिओ क्लिपवर टोला
1

Manoj Jarange Audio Clip Row : ‘500 कोटी म्हणजे पारावरच्या गप्पा!’ छगन भुजबळांचा जरांगेच्या ऑडिओ क्लिपवर टोला

Manoj Jarange Audio Clip Controversy : ऑडिओ क्लिपची SIT चौकशी होणार? शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, फडणवीसांनी दिला शब्द
2

Manoj Jarange Audio Clip Controversy : ऑडिओ क्लिपची SIT चौकशी होणार? शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, फडणवीसांनी दिला शब्द

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास
3

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी; CM Fadnavis यांनी राष्ट्रपतींना दिले निमंत्रण
4

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी; CM Fadnavis यांनी राष्ट्रपतींना दिले निमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.