Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Audio Clip Row : जरांगेंचं फडणवीस आणि शिंदेंना ओपन चॅलेंज! ‘ऑडिओ क्लिपचं सत्य शोधून दाखवा…’

Manoj Jarange Audio Clip Row : जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान देत ऑडिओ क्लिपमागील सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 25, 2026 | 03:49 PM
Manoj Jarange

Manoj Jarange

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगेंचं फडणवीस आणि शिंदेंना थेट आव्हान
  • ऑडिओ क्लिपवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग
  • एसआयटी आणि फॉरेन्सिक तपासाकडे जरांगेंचं लक्ष
 

Manoj Jarange Audio Clip Row : राज्याच्या राजकारणातील वातावरण मनोज जरांगे पाटील यांनी फोडलेल्या ऑडिओ बॉम्बमुळे ढवळून निघाले आहे. महायुतीतमधली छुपी धुसफूसदेखील यानंतर बाहेर पडली. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकमेकांवर चांगलीच आगपाखड करत आहेत. यावरूनच आता जरांगेनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे.

मनोज जरांगेंचं फडणवीस आणि शिंदेंना चॅलेंज

माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी दोन्ही नेत्यांनी ऑडिओ क्लिपमागील सत्य शोधून काढावं, अशी मागणी केली. क्लिप खरी आहे की खोटी, याचा स्पष्ट खुलासा झाला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

NCP Ajit Pawar : अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक! 500 कोटींच्या ऑडिओवरून भाजप-शिंदेगटात वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीची नवी खेळी

जरांगे म्हणाले की, मराठा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या मुद्द्यावरून आता दोन पक्षांतील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. मात्र, या वादातून मूळ प्रश्न बाजूला पडू नये, असंही त्यांनी म्हटलं.

‘दूध का दूध, पाणी का पाणी करा’

ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत बोलताना जरांगे यांनी फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून तपासावर लक्ष ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. क्लिपमधील दावे खरे आहेत की नाहीत, हे तपासातून स्पष्ट व्हायला हवं, असं त्यांनी सांगितलं.

तसंच, मराठा समाजाने दोन्ही नेत्यांसाठी काम केलं आणि मतदानही केलं, असा उल्लेख करत जरांगेंनी आंदोलनाबाबत त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनासंदर्भातील आरोपांची चौकशी करून सत्य समोर आणावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

एसआयटी आणि फॉरेन्सिक तपासाकडे लक्ष

या प्रकरणात एसआयटी आणि फॉरेन्सिक तपासाच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल, अशी आशा जरांगे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, असंही ते म्हणाले.

दरम्यान, ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या राजकीय वादात वरिष्ठ नेत्यांनी संयम बाळगण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांना काहीसा विराम मिळाल्याचं चित्र आहे.

मात्र, या संपूर्ण प्रकरणात तपासातून नेमकं काय समोर येतं आणि सरकार या मागणीवर काय भूमिका घेतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनोज जरांगे पाटील यांनी कोणाला ओपन चॅलेंज दिलं?

    Ans: मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑडिओ क्लिपमागील सत्य शोधून काढण्याचं आव्हान दिलं.

  • Que: मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लिपबाबत काय मागणी केली?

    Ans: ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून ती खरी आहे की खोटी, हे स्पष्ट करावं, अशी जरांगे यांची मागणी आहे. एसआयटी आणि फॉरेन्सिक तपासातून सत्य समोर येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Manoj jarange audio clip row open challenge devendra fadnavis eknath shinde audio clip truth vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil

संबंधित बातम्या

NCP Ajit Pawar : अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक! 500 कोटींच्या ऑडिओवरून भाजप-शिंदेगटात वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीची नवी खेळी
1

NCP Ajit Pawar : अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक! 500 कोटींच्या ऑडिओवरून भाजप-शिंदेगटात वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीची नवी खेळी

Pradeep Purnekar Case : ‘१३ CCTV फुटेज दिले, तरी अटक नाही’, राम पूर्णेकर संतापले, आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार!
2

Pradeep Purnekar Case : ‘१३ CCTV फुटेज दिले, तरी अटक नाही’, राम पूर्णेकर संतापले, आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार!

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
3

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’
4

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.