Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन-उद्घाटनाच्या कामांचा धडाका अन्…

पुण्यातील तब्बल ३ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची उद्घाटने सोमवारी (आज) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाच कार्यक्रमात होणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 15, 2025 | 12:08 PM
महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन-उद्घाटनाच्या कामांचा धडाका अन्...

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन-उद्घाटनाच्या कामांचा धडाका अन्...

Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग
  • पुण्यात भूमिपूजन-उद्घाटनाचा धडाका
  • आजच निवडणुकीचे बिगुल वाजणार?
पुणे : महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुकांची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी आचारसंहिता लागण्याची चिन्हे असून, नव्या वर्षांच्या सुरवातीला १४ किंवा १५ जानेवारी रोजी मतदान होण्याची शक्यता असल्याने शहरात गेल्या काही दिवसात मार्गी लागलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करून घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. पुण्यातील तब्बल ३ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटने सोमवारी (दि १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाच कार्यक्रमात होणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजप व महापालिकेतर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे सुरू आहे.

 

महापालिकेचे सभागृह १४ मार्च २०२२ रोजी मध्यरात्री विसर्जित झाले आणि त्यानंतर निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, या निवडणुका गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडल्या आहेत. महापालिकेवर सध्या प्रशासकराज आहे. आयुक्तच प्रशासकाची भूमिका निभावत आहेत. राज्यातील इतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावरील सुनावणीत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरला संपताच निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शहरातील निवडणूकपूर्व हालचालींना जोर आला आहे.

प्रशासक काळात पूर्वी मंजुरी मिळालेल्या तसेच पाठपुरावा केलेल्या अनेक कामांना गती मिळाली आहे. पूर्णत्वास गेलेल्या या प्रकल्पांचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यात सत्ताधारी भाजपने विशेष पुढाकार घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात विविध विकास कामांच्या उद्घाटनाची तयारी केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येणार असून, शहराच्या मध्यवर्ती भागांसह विविध उपनगरांतील प्रकल्पांचा समावेश असलेल्या तब्बल ३ हजार कोटींपेक्षा अधिक प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यकम म्हणजे भाजपचे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी महापालिका प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे.

या कामांचे होणार उद्घाटन

महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीतील अ आणि ब विंग, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची नवी इमारत, खराडी, चांदणी चौक व बाणेर येथील अग्निशामक केंद्रे, विविध सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आपत्ती व्यवस्थापनासाठीचे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, जागतिक सायकल स्पर्धेसाठी केलेले ७५ किमीचे रोड नेटवर्क, समान पाणीपुरवठा योजनेतील पूर्णत्वास गेलेले ४० झोन, तसेच काही दवाखाने व आरोग्य केंद्रांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

या कामांचे होणार भूमीपूजन

कार्यक्रमात बिंदू माधव ठाकरे चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर, आचार्य आनंदऋषिजी महाराज (विद्यापीठ) चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन तसेच ग्रेड सेपरेटरचे भूमीपूजन, पाणीपुरवठ्याचे विविध प्रकल्प आणि वडगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राचे भूमीपूजन अशा सुमारे ४०० ते ५०० कोटी रुपयांच्या नव्या कामांची मुहूर्तमेढही रोवली जाणार आहे.

Web Title: Code of conduct to be required soon for pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Election News
  • pune news

संबंधित बातम्या

“पुण्याच्या विकासाचा नवा…”; निवडणुकीआधी Devendra Fadnavis यांनी दिली ३ हजार कोटींची भेट
1

“पुण्याच्या विकासाचा नवा…”; निवडणुकीआधी Devendra Fadnavis यांनी दिली ३ हजार कोटींची भेट

Pune Khed :  रेल्वे मार्गासाठी रस्त्यावर उतरणार, दिलीप वळसे पाटीलांचा सरकारला इशारा
2

Pune Khed : रेल्वे मार्गासाठी रस्त्यावर उतरणार, दिलीप वळसे पाटीलांचा सरकारला इशारा

सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत ड्रग्सच्या पैशाचा महापूर, ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र; सपकाळांचा घणाघात
3

सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत ड्रग्सच्या पैशाचा महापूर, ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र; सपकाळांचा घणाघात

Navarashtra Special: पुणे सर्वांचे लाडके; हिवाळ्यात बनले स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान
4

Navarashtra Special: पुणे सर्वांचे लाडके; हिवाळ्यात बनले स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.