Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास खैर नाही! पहाटेच रस्त्यावर उतरत पालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना दट्ट्या

विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींसाठी पालिकेने सुरू केलेल्या 'मार्ग' (मॅनेजमेंट अँड रिड्रेसल ऑफ ग्रिव्हियन्स) या समर्पित ॲप्लिकेशनचा प्रभावीपणे वापर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

  • By सुरुची कदम
Updated On: May 21, 2026 | 11:30 AM
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास खैर नाही! पहाटेच रस्त्यावर उतरत पालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना दट्ट्या

तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास खैर नाही! पहाटेच रस्त्यावर उतरत पालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना दट्ट्या

Follow Us
Follow Us:

मुंबई: नागरिकांकडून विविध नागरी सुविधा किंवा समस्यांबाबत येणाऱ्या तक्रारी या प्रशासनासाठी कान आणि डोळ्यांसारख्या आहेत. या तक्रारींच्या माध्यमातून प्रशासनाला थेट आणि वास्तविक प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे वेळीच निराकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. तसेच विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींसाठी पालिकेने सुरू केलेल्या ‘मार्ग’ (मॅनेजमेंट अँड रिड्रेसल ऑफ ग्रिव्हियन्स) या समर्पित अॅप्लिकेशनचा प्रभावीपणे वापर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Mumbai News : प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूने खळबळ; भाभा रुग्णालयातील सुविधांवर पुन्हा प्रश्चचिन्ह

पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी (२० मे) रोजी पहाटेच्या सुमारास दक्षिण मुंबईतील विविध परिसरांना अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.यामध्ये फोर्ट परिसरातील सुमारे १०० वर्षे जुनी आणि मुंबईतील पहिली कीटकनाशक नियंत्रण चौकी, ‘ए’ व ‘सी’ विभागातील रस्ते दुरुस्ती, भांडार व मलनिस्सारण चौकग्या, स. का. पाटील उद्यान, नाना चौक परिसर आणि वरळी येथील लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन (पंपिंग स्टेशन) केंद्राचा समावेश होता. या दौऱ्यादरम्यान त्या बोलत होत्या.

हॉटेलचालकांना नियम पाळण्याचे आवाहन

शहरात जागोजागी असणाऱ्या खाऊगल्ल्या आणि रस्त्यांशेजारील दुकानांमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नकचरा निर्माण होतो. यामुळे उंदीर, मांजर आणि डासांचा उपद्रव वाढण्याची भीती आयुक्तांनी व्यक्त केली.हॉटेल आणि अन्न विक्रेत्यांनी हा कचरा इतरत्र न फेकता तो बॅगमध्ये भरून पालिकेच्या कचरा संकलन गाड्यांकडेच सुपूर्द करावा, यासाठी प्रशासनाने त्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना भिडे यांनी दिल्या. तसेच, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांनी बांधकामाच्या ठिकाणी स्वतःची यंत्रणा व कर्मचारी नेमणे बंधनकारक करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Bandra Demolition : वांद्रे गरीब नगर झोपडपट्टीवर कारवाईवेळी तणाव; पोलिसांवर पाणी-बादल्या फेकल्यानंतर लाठीचार्ज

फोर्ट येथील ७४-मिंट मार्ग येथील ऐतिहासिक कीटकनाशक नियंत्रण चौकीला भेट देऊन आयुक्तांनी तेथील उपकरणांची आणि मूषक नियंत्रणासाठी (उंदीर मारणे) केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. कर्मचाऱ्यांच्या हजेरी पटाचीही त्यांनी पडताळणी केली. तसेच, स. का. पाटील उद्यानातील अभ्यासिकेत जाऊन विद्यार्थ्यांशी आणि उद्यानात आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. कर्तव्य बजावत असतानाच विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवणाऱ्या ‘डी’ विभागातील कीटकनाशक चौकीच्या कर्मचाऱ्यांचे आयुक्तांनी कौतुक केले. या पाहणी दौऱ्यात उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, उपायुक्त प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त अलका ससाणे (सी विभाग), गजानन बेल्लाळे (ए विभाग), संतोष साळुंके (डी विभाग) यांच्यासह पालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Complaints are ignored early in the morning municipal commissioners came down on the streets and scolded the officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Ashwini Bhide
  • Mumabi
  • mumbai mahapalika

संबंधित बातम्या

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ
1

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.