Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शाळेतील विद्यार्थ्यांची पडताळणी 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा’; शालेय शिक्षण विभागाचे आदेश

येत्या १५ डिसेंबरपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता, बनावट नोंदणी किंवा चुकीची माहिती आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 29, 2025 | 11:52 AM
शासनविरोधातील आंदोलन शिक्षकांना भोवले? तब्बल 25 लाख शिक्षकांचे पगारच रोखले

शासनविरोधातील आंदोलन शिक्षकांना भोवले? तब्बल 25 लाख शिक्षकांचे पगारच रोखले

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला असून, विशेष पथकांच्या माध्यमातून एकाच वेळी उपस्थिती पडताळणी करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता, बनावट नोंदणी किंवा चुकीची माहिती आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे.

या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

हेदेखील वाचा : शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरण दोन शिक्षणाधिकाऱ्यांच्या अंगलट; राज्य सरकारने केली ‘ही’ मोठी कारवाई

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून शाळांची संचमान्यता UDISE + प्रणालीत मुख्याध्यापकांनी भरलेल्या माहितीनुसार केली जाणार आहे. यासाठी मुख्याध्यापकांच्या लॉगिनमार्फत विद्यार्थ्यांची माहिती प्रणालीत सादर करण्यात येत आहे. ही माहिती योग्य, अचूक आणि वास्तवाधिष्ठित आहे की नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

मुख्याध्यापकांनी भरलेली सर्व माहिती केंद्रप्रमुखांच्या लॉगिनला पाठविण्यात आली असून, त्यानुसार केंद्रप्रमुखांनी संबंधित शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन दैनंदिन उपस्थिती नोंद, भेटीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी, परीक्षा दिनांकास उपस्थित विद्यार्थी, यापूर्वी भेटीच्या वेळी उपस्थितीची नोंद, या सर्व बाबींच्या आधारे विद्यार्थ्यांची काटेकोर पडताळणी करावी लागणार आहे.

…तर पट संचमान्यतेसाठी पुढे पाठवला जाणार नाही

या प्रक्रियेदरम्यान बनावट विद्यार्थी, सातत्याने अनुपस्थित असणारे विद्यार्थी किंवा शिक्षक शिक्षकेतर पदे मंजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक वाढविलेला पट संचमान्यतेसाठी पुढे पाठवला जाणार नाही, याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

UDISE + स्टुडंट पोर्टलवर नोंद असलेल्यांपैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाल्याचे आढळल्यास, केंद्रप्रमुखांनी अशा विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनकडे फेरपडताळणीसाठी वर्ग करावे, गटशिक्षणाधिकारी फेरपडताळणीनंतर माहिती योग्य असल्यास ती अंतिम करावी, चुकीची नोंद सिद्ध झाल्यास संबंधित विद्यार्थी संख्या कमी करावी.

संपूर्ण फेरपडताळणी व विद्यार्थी माहिती अंतिम करण्याची प्रक्रिया १५ डिसेंबरपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, बनावट पट नष्ट करून शासनाच्या शैक्षणिक योजनांचा लाभ योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

हेदेखील वाचा : मोठी बातमी ! राज्यातील ‘इतक्या’ मराठी शाळा बंद होणार? अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार, ‘हे’ कारण ठरतंय अडचणीचे…

Web Title: Complete verification of school students by december 15 school education department orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • Education Department
  • Maharashtra Education
  • School Education

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! उद्या अनेक शाळांना सुट्टी जाहीर; कारण नेमकं काय?
1

मोठी बातमी ! उद्या अनेक शाळांना सुट्टी जाहीर; कारण नेमकं काय?

राज्यातील RTE शाळांच्या संख्येत घट; तब्बल 771 शाळा झाल्या कमी
2

राज्यातील RTE शाळांच्या संख्येत घट; तब्बल 771 शाळा झाल्या कमी

मोठी बातमी ! TET परीक्षेचा अंतिम निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष…
3

मोठी बातमी ! TET परीक्षेचा अंतिम निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.