Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : गॅसही संपला अन् केरोसीनही मिळेना! सामान्यांचे हाल, वितरकांमध्ये संभ्रम

केंद्र सरकारने तात्पुरत्या स्वरूपात पुणे ग्रामीणसाठी २०४ किलो लिटर केरोसीन नियतन मंजूर केले असले, तरी हे नियतन कायमस्वरूपी राहणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2026 | 11:52 AM
Confusion Arises Among Kerosene Distributors Following LPG Shortage pune news

Confusion Arises Among Kerosene Distributors Following LPG Shortage pune news

Follow Us
Close
Follow Us:

Pune News : पुणे : आकाश ढुमेपाटील : एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने केरोसीन अर्थात रॉकेल दिले जाणार असल्याच्या चर्चा आहे. मात्र राज्य सरकारकडून (Maharashtra Government) केरोसीन वितरणासंदर्भात स्पष्ट धोरण जाहीर न झाल्याने पुणे ग्रामीण भागातील वितरकांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने तात्पुरत्या स्वरूपात पुणे ग्रामीणसाठी २०४ किलो लिटर केरोसीन नियतन मंजूर केले असले, तरी हे नियतन कायमस्वरूपी राहणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. परिणामी, वितरणाची जबाबदारी स्वीकारण्यास अनेक वितरक टाळाटाळ करत आहेत.

वितरण प्रक्रियेत होणारा संभाव्य तोटा हे यामागील प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. ग्रामीण स्तरावरील एका वितरकाला साधारण एक हजार ते दीड हजार लिटर केरोसीन मिळणार असून प्रति लिटर १ रुपया ३५ पैसे इतके कमिशन देण्यात येणार आहे. या प्रमाणात वितरकाला सुमारे दीड हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असते. मात्र, वितरणासाठी आवश्यक लोखंडी ड्रम, मोजमाप साधने आणि अन्य साहित्याचा खर्च मिळून सुमारे अडीच हजार रुपये होतो. त्यामुळे प्रत्यक्षात वितरण परवडत नसल्याची भावना वितरकांकडून व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा : गॅस टंचाईवर सरकारचा मास्टरप्लॅन; पुण्यात PNG GAS जाळ्याचा विस्तार, काय आहे शेवटची तारीख?

पूर्वी केरोसीन वितरण बंद झाल्यामुळे अनेक परवानाधारकांनी आवश्यक साहित्य विकून टाकल्याचेही काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्याचबरोबर घाऊक परवानाधारकांना वाहनांसाठी आरटीओ पासिंग आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक आणि प्रशासकीय भारही वाढत आहे.

दरम्यान, HPCL आणि IOCL या कंपन्यांकडून घाऊक वितरकांना सुमारे ५८ रुपये दराने केरोसीन पुरवठा केला जाणार असून त्यामध्ये वाहतूक खर्च आणि मर्यादित नफा धरून वितरण करावे लागणार आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि इतर योजनांमुळे एलपीजी गॅस कनेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर कडोजी देवबा पंड विरुद्ध केंद्रशासन या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी ७ जानेवारी २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार गॅस कनेक्शन असलेल्या कुटुंबांना केरोसीन वितरणावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे राज्यात केरोसीनचे वितरण अत्यंत मर्यादित झाले आहे.
तथापि, सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्राने तात्पुरत्या स्वरूपात केरोसीन नियतन मंजूर केले आहे. मात्र, भविष्यात असे नियतन कायम राहील का, याबाबत स्पष्टता नसल्याने वितरकांमध्ये अनिश्चितता कायम आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; कोयना जलाशयावरील पुलांची केली पाहणी

दरम्यान, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य देत पुणे ग्रामीणमधील १३ तालुक्यांसाठी एकूण २ लाख ४ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे. या तालुक्यांमध्ये एकूण ५ लाख ५४ हजार ११३ अंत्योदय शिधापत्रिका असून त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.

एकूणच, धोरणात्मक स्पष्टतेअभावी आणि आर्थिक तोट्याच्या भीतीमुळे केरोसीन वितरणाबाबत ग्रामीण भागात अनिश्चिततेचे वातावरण असून, राज्य सरकारने तातडीने स्पष्ट धोरण जाहीर करण्याची मागणी वितरकांकडून केली जात आहे.

Web Title: Confusion arises among kerosene distributors following lpg shortage pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 11:52 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.