Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप आमदाराच्या पीएचीच दोन मतदारसंघात नोंदणी; काँग्रेसने केली पोलखोल

काँग्रेसने दक्षिणच विद्यमान आमदार डॉ. अतुल भोसले यांचे स्वीय सहाय्यक अमोल पाटील यांच्यासह फत्तेसिंह सरनोबत यांच्या नावांची दोन वेगवेगळ्या मतदारसंघात नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 24, 2025 | 01:26 PM
भाजप आमदाराच्या पीएचीच दोन मतदारसंघात नोंदणी; काँग्रेसने केली पोलखोल

भाजप आमदाराच्या पीएचीच दोन मतदारसंघात नोंदणी; काँग्रेसने केली पोलखोल

Follow Us
Close
Follow Us:

कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दुबार मतदार नोंदणीच्या प्रकरणावरून काँग्रेसनेही भाजपवर पलटवार करत टीकेची झोड उठवली आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकांचे मतदार यादीत दुबार नाव असल्याचे समोर आणले होते. आता काँग्रेसने दक्षिणच विद्यमान आमदार डॉ. अतुल भोसले यांचे स्वीय सहाय्यक अमोल पाटील यांच्यासह फत्तेसिंह सरनोबत यांच्या नावांची दोन वेगवेगळ्या मतदारसंघात नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

शुक्रवारी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणाले, “बोगस मतदान लपविण्यासाठी मोठी नावे घेण्याचा प्रकार भाजपकडून केला जात आहे. ही चोरी लपविण्यासाठी चोराच्याच उलटा बोंबा मारले जात आहेत.”
यावेळी इंद्रजीत चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर, ओबीसी सेलचे भानुदास माळी, अल्पसंख्याक सेलचे झाकीर पठाण, अजीत पाटील-चिखलीकर आणि रेठरे बुद्रूकचे दिग्विजय पाटील उपस्थित होते.

भाजपच्या आरोपांना उत्तर देताना गजानन आवळकर म्हणाले, “माझे नाव वाठार व कराड अशा दोन ठिकाणी होते. मात्र कराडमधील नाव कमी करण्यासाठी मी अर्ज दिला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर सुनावणी झाली, पण हरकत घेणारेच उपस्थित राहिले नाहीत. तरीही नाव कमी झाले नाही, याला प्रशासन जबाबदार आहे. मी दोनदा मतदान केलेले नाही. आरोप करणाऱ्यांनी आठ दिवसात पुरावा सादर करावा, अन्यथा मी कायदेशीर कारवाई करेन.”

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांच्यावर दुबार मतदानाचे आरोप झाले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण म्हणाले, “माझा जन्म कराडचा असून वास्तव्य बदलल्यामुळे नाव वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये राहिले. मी पाटण कॉलनी, पवार कॉलनी आणि नंतर मलकापूर येथे राहिलो. प्रत्येक वेळी जुन्या नावावरून नाव कमी करण्यासाठी अर्ज केला; पण प्रशासनाने दुर्लक्ष केले. माझ्या पत्नी, मुलगा आणि आईचीही दुबार नावे रद्द करण्याची मागणी केली आहे. आम्ही नेहमी एकाच ठिकाणी मतदान केले आहे. बोगस मतदानाला आमचा विरोध आहे.”

दिग्विजय पाटील यांनीही भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “विद्यमान आमदारांचे दोन स्वीय सहाय्यक अमोल पाटील (अंकलखोप) आणि फत्तेसिंह सरनोबत (इस्लामपूर) यांच्या नावांची नोंद त्यांच्या मूळ गावात आणि कराड दक्षिण मतदारसंघात आहे. पाटील तर अंकलखोपचे माजी उपसरपंचही आहेत. भाजप खऱ्या बोगस मतांची चोरी लपविण्यासाठी मोठी नावे घेत आहे.”

फिजिओथेरपी विद्यार्थ्यांचीही मतदारयादीत नोंदणी

पत्रकार परिषदेत आणखी एक धक्कादायक मुद्दा समोर आला. कराड येथील फिजिओथेरपी महाविद्यालयातील तब्बल ५२ विद्यार्थ्यांची नोंदणी कराड दक्षिण मतदारसंघात झाली आहे. ही नावे शिवनगर बुथवर दिसत असून, काही निवृत्त कामगारांची नावेही रेठरे बुद्रूकच्या मतदार यादीत आहेत. यावर बोट ठेवत दिग्विजय पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “ही खरी मतांची चोरी आहे. त्याचे उत्तर भाजप देऊ शकत नाही, म्हणून उलट काँग्रेसवर बोट दाखवले जात आहे.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Web Title: Congress has alleged that bjp mlas 2 pas are registered in two constituencies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 01:26 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Dr Atul Bhosale
  • Election Commision

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधींची सुरक्षा भेदली! भर यात्रेत एका तरुणाने घेतला ‘Kiss’, नंतर झाला पसार; पाहा व्हिडिओ
1

Rahul Gandhi: राहुल गांधींची सुरक्षा भेदली! भर यात्रेत एका तरुणाने घेतला ‘Kiss’, नंतर झाला पसार; पाहा व्हिडिओ

भरती प्रक्रिया सुरू करा, अन्यथा…; बेरोजगारीच्या प्रश्नावरुन काँग्रेस आक्रमक
2

भरती प्रक्रिया सुरू करा, अन्यथा…; बेरोजगारीच्या प्रश्नावरुन काँग्रेस आक्रमक

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन
3

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

Satara News: मतचोरीचे वादळ महाराष्ट्रापर्यंत; मतदार याद्यांमधील बोगस नावांवरून सातऱ्यात काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप
4

Satara News: मतचोरीचे वादळ महाराष्ट्रापर्यंत; मतदार याद्यांमधील बोगस नावांवरून सातऱ्यात काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.