Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री बाबासाहेब पाटलांचे विधान निर्लज्जपणाचे, बेताल मंत्र्यांची…; काँग्रेस आक्रमक

मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांच्या विधानावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2025 | 05:41 PM
मंत्री बाबासाहेब पाटलांचे विधान निर्लज्जपणाचे, बेताल मंत्र्यांची...; काँग्रेस आक्रमक

मंत्री बाबासाहेब पाटलांचे विधान निर्लज्जपणाचे, बेताल मंत्र्यांची...; काँग्रेस आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:
  • बाबासाहेब पाटलांच्या विधानावरुन राजकारण तापलं
  • विरोधकांकडून बाबासाहेब पाटलांवर जोरदार निशाणा
  • मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर एक वादग्रस्त विधान केले आहे. लोकांना कर्जमाफीची सवय लागली आहे आणि आम्हाला निवडून यायचे असल्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासने देतो, असं बाबासाहेब पाटील यांनी विधान केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक या विधानावरुन आक्रमक झाले आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरुन प्रतिक्रीया दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे हे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे विधान अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना असे विधान करून त्यांनी जखमेवर मीठ चोळले आहे. फडणवीस सरकारमधले मंत्री वाचाळ, बेशरम व बेताल आहेत, मंत्र्यांने असे विधान करून ते जुमलेबाजी करून सत्तेत आले आहेत हे स्पष्ट केले आहे, अशा बेताल मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे पण मुख्यमंत्री फडणवीस स्वतःच अशा मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असे सपकाळ म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची काँग्रेस पक्षाची तयारी सुरु असून, राज्यतील सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका झाल्या आहेत. मतदार याद्यांच्या पडताळणीचे काम सुरु आहेत. काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांचे अर्जही मागवले आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीकडे हे जमा केले जातील त्यांच्याकडून ते प्रदेश काँग्रेसकडे येतील व प्रदेश काँग्रेस त्यावर निर्णय घेईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कबुतरांची चिंता करताना माणसाच्या आरोग्याचीही चर्चा केली पाहिजे तसेच कबुतरखान्यासाठी पुढाकार घेणारे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विशेष लोढा कबुतरखाना टॉवर उभे करावे यावरही चर्चा व्हायला हवी, असे सपकाळ म्हणाले. तसेच वराह जयंतीनंतर आता छटपूजेचा मुद्दा भाजपा आणत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला जातीपातीची, धर्माची व सण उत्सवाची आठवण होते असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress has become aggressive over babasaheb patils statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers

संबंधित बातम्या

Viral Video: महाराष्ट्राच्या रस्त्यावर शेतकरी उडवू लागले 50-100 च्या नोटा; नक्की झालं तरी काय?
1

Viral Video: महाराष्ट्राच्या रस्त्यावर शेतकरी उडवू लागले 50-100 च्या नोटा; नक्की झालं तरी काय?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संजय पाटील आक्रमक; ‘या’ तारखेला तासगावात चक्काजाम आंदोेलन
2

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संजय पाटील आक्रमक; ‘या’ तारखेला तासगावात चक्काजाम आंदोेलन

शिवसेनेच्या वरिष्ठांनी धंगेकरांना समज द्यावी, नाहीतर…; भाजप नेत्याने दिला इशारा
3

शिवसेनेच्या वरिष्ठांनी धंगेकरांना समज द्यावी, नाहीतर…; भाजप नेत्याने दिला इशारा

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्ट प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोबदला; तब्बल 4,500 कोटी…;
4

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्ट प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोबदला; तब्बल 4,500 कोटी…;

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.