Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला बुलढाणा जिल्ह्यात ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’

काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवार दिनांक ४ मे २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’, आयोजित केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 03, 2026 | 03:39 PM
Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका...

Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका...

Follow Us
Follow Us:

मुंबई : केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही व दुसरीकडे महागाईने शेती करणे कठीण झाले आहे. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत तरीही भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे. सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवार दिनांक ४ मे २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’, आयोजित केली आहे.

या पदयात्रेची सांगता जळगाव जामोद येथील दुर्गा चौकात जाहीर सभेने होणार आहे. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व शेतकरी या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. सरसकट कर्जमाफी करा व शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमी भाव कायदा लागू करा, सोयाबीनला ८ हजार रुपये भाव, हरभरा ८ हजार रुपये, कापसाला १२ हजार रुपये, तुरीला १० हजार रुपये, पीक कर्जाला कुठलीही अट लावू नये, प्रती एकरी प्रती हंगाम ४० हजार रुपये पीक कर्ज द्या, कृषी साहित्य जीएसटी मुक्त करा, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारा, आदिवासी बांधवांना जातीचे दाखले द्या, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरा, या प्रमुख मागण्यांसाठी ही संघर्ष पदयात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.

हे सुद्धा वाचा : मावळ तालुक्यात दुर्दैवी घटना; पवना नदीत पोहायला गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू

महिला आरक्षणासाठी राजीव गांधी अन् सोनिया गांधींचे मोठे योगदान – सपकाळ

महिला आरक्षणाचा पाया १९८५ साली मुंबईत काँग्रेसच्या शताब्दी वर्षानिमित्तच्या कार्यक्रमात स्व. राजीव गांधी यांनी घातला आणि यातूनच पुढे पंचायत राज प्रणाली आणली. ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू केले नंतर ते वाढवून ५० टक्के केले. पुढे सोनिया गांधी यांनी महिला आरक्षणासाठी पुढाकार घेतला परंतु महिला आरक्षण आणताना त्याला कडाडून विरोध भाजपाने केला होता. महिलांचे स्थान केवळ ‘चूल आणि मुल’, आहे असा विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे, असा घणाघाती हल्लाबोल करत महिला आरक्षण उपकार नाही तर हक्क आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावून सांगितले.

Web Title: Congress has organized a padyatra in buldhana district to raise issues of farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
3

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा
4

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.