काँग्रेस म्हणजे देशाला लागलेला कॅन्सर ; चंद्रशेखर बावनकुळे यांची साताऱ्यात टीका
काँग्रेस पक्ष भाजपविषयी जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. डॉ. बाबासाहेबांची घटना बदलणार, मुस्लिम समाजाला देशातून बाहेर काढणार असे पोपटासारखे काहीही सांगत आहे. मुळात काँग्रेस पक्ष म्हणजे ब्लड कॅन्सर आहे.
सातारा : काँग्रेस पक्ष भाजपविषयी जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. डॉ. बाबासाहेबांची घटना बदलणार, मुस्लिम समाजाला देशातून बाहेर काढणार असे पोपटासारखे काहीही सांगत आहे. मुळात काँग्रेस पक्ष म्हणजे ब्लड कॅन्सर आहे. हा पक्ष म्हणजे देशाला लागलेला कॅन्सर आहे. त्याला सर्वांनी मिळून हद्दपार करावे, असा निशाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर साधला. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदींच होतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यात व्यक्त केला. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचा खासदार भाजपचाच होणार असून आमदार शिवेंद्रसिंहराजेंना राज्यात सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
पोवईनाका सातारा येथे छ. शिवाजी महाराज यांना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर ‘घर चलो’ अभियानातंर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सातारा शहरातील बाजारपेठेत पदयात्रा काढून व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच २0२४ मध्ये कोण पंतप्रधान होणार, तुमचा आवडता पंतप्रधान कोण असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर सर्वांनीच मोदी मोदी मोदी..असा जयघोष करत उत्तरे दिली. दरम्यान, ठिकठिकाणी बावनकुळे यांचे पुष्पगुच्छसह जेसीबीमधून गुलाबाच्या फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. त्यानंतर सराफ व्यावसायिक चंद्रशेखर घोडके यांच्या घरासमोर सभा झाली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, सुनील काटकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अतुल भोसले, विक्रम पावसकर, सुरभी भोसले, रंजना रावत, वैशाली राजेमहाडिक, गीतांजली कदम, चंद्रशेखर घोडके, स्मिता घोडके, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, जयेंद्र चव्हाण, राजू भोसले, विकास गोसावी, धनंजय जांभळे, यांच्यासह माजी नगरसेवक व व्यापारी, नागरीक उपस्थित होते.
मोती चौकातून पदयात्रेस सुरवात झाली. येथील मोदी,लाटकर या पेढ्यांच्या व्यावसायिकांशी संवाद साधत बावनकुळे पुढे निघाले. वाटेत फुलांची पुष्पवृष्ट होत होती. पुढे ढोल ताशाचा गजर आणि भाजपचा जयघोष करणारे कार्यकर्ते अशी पदयात्रा सुरु होती. त्यानंतर व्यापारी, व्यावसायिक, सराफ दुकानदार, भांडयाचे व्यापारी, आदींशी संवाद साधत ते सराफ पेठेत पोहोचले. येथे चंद्रशेखर घोडके यांच्या घरासमोर सभेचे आयोजन केले होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यातील शेवटच्या कारागिराला तीन लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. मोदींनी निर्माण केलेल्या गरिब कल्याणच्या योजना घेऊन आम्ही जनतेत जात आहोत. जगातील १५० च्या वर देशांनी सवार्ेत्कृष्ठ पंतप्रधान म्हणून मान्यता दिली आहे. जगातील ७८ टक्के लोकांनी मोदींजींना पसंती दिली आहे. मोदींजींना १४ देशांचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत गोरे व माझे काय होईल हे माहिती नाही पण, शंभर महिला आमदार असतील. मोदींनी या देशाला जगातील एक नंबरचा देश केला आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षाचा तामीळनाडूचा मुख्यमंत्री स्टॅलिन सांगत आहे, आम्ही सत्तेत आलो तर हिंदू संस्कृती संपवून टाकू, असे सांगत आहे. हिंदूंना संपविणे इतके सोपे नाही. त्यामुळे या सर्वांना धडा शिकवण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सातारकरांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी सातारचा खासदार निवडून द्या. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी शिवेंद्रसिंहराजेंना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे. त्या मोदींना हारविण्यासाठी आता २८ पक्ष एकत्र आले आहेत. पण, साताऱ्याच्या जनतेने निर्णय घेतला आहे. किती एक व्हा, उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली मोदी २0२४ मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. त्यावेळी साताऱ्याचा खासदार देशात सर्वाधिक मतांनी निवडून येऊन मोदींचे समर्थन करेल. महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन संसदेत १९१ महिला खासदार पहायला मिळतील. देशाच्या १४० कोटींच्या भवितव्यासाठी काम करतील.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे. त्या मोदींना हारविण्यासाठी आता २८ पक्ष एकत्र आले आहेत. पण, साताऱ्याच्या जनतेने निर्णय घेतला आहे. किती एक व्हा, उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली मोदी २0२४ मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. त्यावेळी साताऱ्याचा खासदार देशात सर्वाधिक मतांनी निवडून येऊन मोदींचे समर्थन करेल. महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन संसदेत १९१ महिला खासदार पहायला मिळतील. देशाच्या १४० कोटींच्या भवितव्यासाठी काम करतील.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून मोदीना साथ देण्यासाठी भाजपचाच खासदार सर्वांनी निवडून द्यायचा आहे. त्यासाठी त्याबाबतचे समर्थन मागायला ते आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थन सातारकरांनी मोठ्या उत्साहाने केले आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मी आपल्या साताऱ्याच्यावतीने चंद्रशेखर बावनकुळे यांना शब्द देतो की, येणारा खासदार हा शंभर टक्के भाजपचाच असेल. आमच्या लोकसभेचा खासदार हा नरेंद्र मोदीजी जेव्हा शपथ घेतील, त्यावेळी हात वर करण्यासाठी उभा असेल, असा शब्द सातारकरांच्यावतीने मी देतो. नुकत्याच झालेल्या झी २0 परिषदेमध्ये आपण पाहिले आहे. आपल्यापेक्षा प्रगत देशातील पंतप्रधान असो की, राष्ट्रपती हे मोदींजीने दिलेल्या निमंत्रणावरुन भारतात आले होते. हे महत्व आज जगाने ओळखले आहे. आता ते आपण ओळखायचं आहे. त्यामुळे आपला सर्वांचा सातारकरांचा एकच निर्णय सातारा आणि जावली तालुक्यातून या विधानसभा मतदारसंघातून ६५ टक्केच्या पुढे मतदान हे भाजपच्या लोकसभेच्या उमेदवाराला होईल. अन मोठ्या मताधिक्क्याने लोकसभेचा उमेदवार निवडून येईल.
पदयात्रेस उदयनराजेंची दांडी
सातारा शहरात आगमन झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर ते पदयात्रेसाठी मोती चौकात दाखल झाले. मोती चौक ते शनिवार चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. पण, खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले हे अनुपस्थित होते. या पदयात्रेत त्यांच्या गैरहजेरीची शहरात मोठी चर्चा होती. उदयनराजे आजारी असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत होते. तर काहीजण बहुतेक लोकसभेचा उमेदवार भाजप बदलण्याची शक्यता असल्याने ते नाराज झाल्याने आले नसल्याच्या चर्चा ही या पदयात्रेत खुमासदारपणे रंगल्या होत्या.
Web Title: Congress is the cancer of the country criticism of chandrasekhar bawankule in satara