Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सगळा त्याग जनतेने करायचा अन् मोदींनी फक्त…; पंतप्रधानांच्या आवाहनानंतर हर्षवर्धन सपकाळांची टीका

नरेंद्र मोदी यांनीच ‘राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करत वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे’, ही १४० कोटी जनतेची भावना आहे, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 11, 2026 | 02:23 PM
सगळा त्याग जनतेने करायचा अन् मोदींनी फक्त...; पंतप्रधानांच्या आवाहनानंतर हर्षवर्धन सपकाळांची टीका

सगळा त्याग जनतेने करायचा अन् मोदींनी फक्त...; पंतप्रधानांच्या आवाहनानंतर हर्षवर्धन सपकाळांची टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर व खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यास ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल ठरल्याचे द्योतक आहे. जनतेला त्याग करण्याचा नाहक सल्ला व उपदेश देणारे मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. सगळा त्याग जनतेने करायचा आणि नरेंद्र मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का ? असा संतप्त प्रश्न विचारून, प्रचारमंत्री नरेंद्र मोदी यांनीच ‘राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करत वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे’, ही १४० कोटी जनतेची भावना आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते तेव्हा प्रचारमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजीपणाची, अहंकारी, लहरी कारभाराची मोठी किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागत आहे. देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, सोने-चांदी सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त जाहिरातबाजी, फोटोशूट व इव्हेंटबाजीत व्यस्त आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली आणि आता जनतेलाच उपदेश देत स्वतः मात्र ४०-५० गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. देशाला दूरदृष्टी असलेला नेता नसला की, यापेक्षा वेगळे काही होणार नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मार्च महिन्यात देशासमोरील संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या नरेंद्र मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून देशाला संकटाच्या खाईत ढकलले आहे. कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत असताना हे महाशय टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन करत होते. नोटबंदी, जीएसटी, कोविड संकटानंतर देशावर सर्वात मोठे संकट आले आहे आणि या संकटास नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : आरोपींना 2 दिवसात अटक करा, नाहीतर…; विकास लवांडे शाईफेक प्रकरणावरुन रोहित पवारांचा इशारा

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized prime minister narendra modi 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
3

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
4

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.