Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांना पत्र पाठविले आहे. या पत्रातून त्यांनी महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 29, 2026 | 05:10 PM
१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

Follow Us
Follow Us:
  • १२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी
  • हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या
  • सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
मुंबई : राज्यात सध्या सुरु असलेल्या एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीमधील नावासंदर्भात दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिलेली आहे, ही मुदत अत्यंत अपुरी आहे. सध्या येत असलेल्या तांत्रीक अडचणी व मोठ्या प्रमाणावरील हरकतींची संख्या पाहता हा वेळ पुरेसा नाही. १२ ऑक्टोबरची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवून द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांना पाठवलेल्या पत्रात ते पुढे म्हणतात की, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने एसआयआर संदर्भात आपली भेट घेऊन मुद्देसूद चर्चा केली होती, त्यातील प्रमुख मागणी दावे व हरकती दाखल करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी ही होती, त्यासाठी संयुक्तिक कारणेही दिली होती परंतु निवडणूक आयोगाने फक्त १२ दिवसांचा कालावधी दिला आहे. आजही ASDDO यादीतील १ कोटी ५४ लाख व ४० लाख नव युवक/ युवतीपैकी फक्त ३ लाख ९० हजार नागरिकांनी नमुना अर्ज ६ मतदार नोंदणी करीता दाखल केले आहेत. नमुना अर्ज ६ मधील चुका आपल्या निदर्शनास आणून दिल्या परंतु नवीन छपाई केलेली नाही, त्यामुळे नागरिकांना नवीन अर्ज उपलब्ध होत नाहीत. ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे तसेच आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक नसल्याने व मराठी व इंग्लिश नावामध्ये फरक जाणवत असल्याने मतदार यादीत नाव नोंदवण्यास अडचणी येत आहेत.

बीएलओ घरोघर नोटीसा बजावत आहेत, आता कागदपत्रे गोळा करणार, मग नवीन अर्ज कोण स्वीकारणार? शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू आहेत, अनेक बीएलओ  शिक्षक आहेत, त्यांच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहेच. अतिरिक्त कामाचे त्यांच्यावर दडपण आहे. नवरात्रउत्सव  देखील आहे, त्यामुळे कोटयवधी नागरिकांना मतदार नोंदणीकरीता पुरेसा वेळ नाही. मतदार नोंदणीचे काम योग्य पध्दतीने होण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ आवश्यक आहे.

दिल्लीप्रमाणे दररोज किती ६/७/८ क्रमांकाचे अर्ज आले, याची विधानसभानिहाय आकडेवारी जाहीर करावी. duplication software चा वापर करून सुध्दा प्रारूप यादीत लाखो दुबार मतदारांची नावे प्रसिद्ध झालीत. एकाच लोकसभा मतदारसंघात २५००० अधिक दुबार मतदारांची यादी नागपूर जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आली आहे. सदर नावांची पुन्हा पडताळणी करून वगळण्यात यावीत असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has sent a letter to the election commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Congress
  • Election Comission
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’
1

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
2

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवावे; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3

निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवावे; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय
4

जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.