Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

माझा पक्ष व मला वाचवा अशी मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 25, 2025 | 05:13 PM
मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:
  • मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव
  • एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी
  • हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई : भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून, दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्तेतील गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असे नाही. भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रचंड वाद आहेत, तिन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याने हे सरकार पाच वर्ष कसे चालणार हा कुतुहलाचा प्रश्न आहे. आता शिंदेंच्या शिवसेनेलाच गिळंकृत करण्याचा डाव भाजपाने आखला असून स्वतःला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत, पण भाजपचा मित्रपक्षांबद्दलचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ते शिंदेना कितपत दाद देतील हे पहावे लागेल, असे सपकाळ म्हणाले.

फलटणमधील महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण उघड होऊन २४ तास झाले तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर चकार शब्दही काढला नाही. असा असंवेदनशील व अकार्यक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला याआधी कधी लाभला नाही, हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न सुरु असल्याचे दिसते. महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर जे आरोप होत आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. त्या महिला डॉक्टरने तक्रार करुनही त्याची दखल घेतली नाही, पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात आहे. सुसाईड नोटही गायब करतील म्हणून त्या महिला डॉक्टरने हातावर नोट लिहिली होती असेही सपकाळ म्हणाले.

संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरकार त्यांच्याच पक्षाचे आहे, मातृभूमी फाऊंडेशनची उच्चस्तरीय चौकशी करा किंवा एसआयटी बसवा आणि त्यात काही तथ्य असेल तर कठोर शिक्षा करा पण ते कांगावा करत असतील तर सार्वजनिक जिवनातून निवृत व्हावे असे आव्हान सपकाळ यांनी दिले आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे जाहीर आश्वासन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहे. मध्यतंरी अजित पवार यांनी आम्ही असे म्हटले नव्हते असे म्हणाताच त्यांचा जाहिरनामाच त्यांना दाखवला होता तरिही ते पुन्हा कांगावा करत आहेत. खोटं बोल पण रेटून बोल, ही भाजपाची शैली अजित पवारांनी उचलली असून ‘वाण नाही पण गुण तरी लागला’, असेच म्हणावे लागेल, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has targeted eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Harshwardhan Sapkal

संबंधित बातम्या

फटाके उडविताना वाद, तिघांवर कोयता अन् दगडाने हल्ला; नेमकं काय घडलं?
1

फटाके उडविताना वाद, तिघांवर कोयता अन् दगडाने हल्ला; नेमकं काय घडलं?

हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचे हाल बेहाल! खड्डे, वाहतूक कोंडी अन्…; राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’
2

हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचे हाल बेहाल! खड्डे, वाहतूक कोंडी अन्…; राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’

Maharashtra Politics: मोहोळांंवर आरोप करताच एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, “धंगेकरांना काय…”
3

Maharashtra Politics: मोहोळांंवर आरोप करताच एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, “धंगेकरांना काय…”

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिनसलं? एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण
4

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिनसलं? एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.