Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीबाबतचा निर्णय…; रमेश चेन्नीथलांनी दिली माहिती

जेथे गरज असेल तेथे आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 20, 2025 | 06:53 PM
स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीबाबतचा निर्णय...; रमेश चेन्नीथलांनी दिली माहिती

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीबाबतचा निर्णय...; रमेश चेन्नीथलांनी दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर
  • आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल
  • रमेश चेन्नीथलांनी दिली माहिती
मुंबई : राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून, आता महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेस पक्षाने निवणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरु असून जेथे गरज असेल तेथे आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश, बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, रेहाना रेयाज चिस्ती, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, मोहन जोशी आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा प्रचंड वापर केला जात आहे. भाजपा महायुती सरकारला जनतेच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नाही. शेतकरी, बेरोजगारी, महिला, कायदा सुव्यवस्था याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत विजयी करेल, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे तशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मुंबई वगळता इतर ठिकाणी समविचारी पक्षांशी चर्चा सुरु आहे पण जेथे आवश्यकता आहे तेथे भाजप महायुती सोडून इतर समविचारी पक्षांशी आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. राज्यातील प्रमुख नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची विभागवार जबाबदारी दिलेली आहे, रणनिती ठरवणे, प्रचार यात ते सक्रीय आहेत, असेही चेन्नीथला यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात टिळक भवनमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नुकतीच दोन दिवस सविस्तर चर्चा झालेली आहे. राज्यातील २८८ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुका व २८ महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसदर्भात आज चर्चा करण्यात आली आहे. आमचा लढा वैचारिक असून राज्यातील भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेस पक्ष लढा देत आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न दिसत आहे. भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे, महाराष्ट्र विकण्याचे काम सुरु आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader ramesh chennithala has criticized the ruling party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 06:53 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Ramesh Chennithala

संबंधित बातम्या

Shalinitai Patil: ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

Shalinitai Patil: ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Aaditya Thackeray : जिथे भाजपची सत्ता आली तिथे प्रगतीचा उलटा प्रवास; आदित्य ठाकरे यांची टीका
2

Aaditya Thackeray : जिथे भाजपची सत्ता आली तिथे प्रगतीचा उलटा प्रवास; आदित्य ठाकरे यांची टीका

महाविकास आघाडीची भाकरी भाजणार की करपणार! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात
3

महाविकास आघाडीची भाकरी भाजणार की करपणार! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसचा इशारा
4

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.