Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदींच्या स्वदेशी नाऱ्याला मित्रपक्षाकडूनच केराची टोपली; मंत्री सरनाईकांनी खरेदी केलेल्या कारवरुन काँग्रेसचा निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवण्याचे काम राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच केले, असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 07, 2025 | 03:49 PM
मोदींच्या स्वदेशी नाऱ्याला मित्रपक्षाकडूनच केराची टोपली; मंत्री सरनाईकांनी खरेदी केलेल्या कारवरुन काँग्रेसचा निशाणा

मोदींच्या स्वदेशी नाऱ्याला मित्रपक्षाकडूनच केराची टोपली; मंत्री सरनाईकांनी खरेदी केलेल्या कारवरुन काँग्रेसचा निशाणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवण्याचे काम राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच केले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेची गाडी तीही पूर्णपणे आयात केलेली खरेदी करणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या आदेशाचे हे खुलेआम उल्लंघन नाही का? ते ही भाजपा प्रणित सरकारच्या मंत्र्यांकडून? असे प्रश्न उपस्थित करून भाजपाने यावर विशेष टिपण्णी करावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत पुढे म्हणाले की, प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने नोटीस बजावली होती. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही सरनाईक यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशीचा नारा देताना म्हणाले आहेत की, पैसा काळा असो की गोरा असला तरी चालेल, त्यामुळे आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमेरिकेच्या कंपनीने बनवलेली टेस्ला ही कार घेतली, त्यासाठी दिलेले पैसा काळा होता का गोरा, हा प्रश्न आता काला धन नावाने बोंब ठोकणाऱ्या नरेंद्र मोदींनीच संपवला आहे, त्यामुळे ही अमेरिकेची कार घेताना कोणता पैसा वापरला याचे उत्तर गुलदस्त्यात राहील. मोदींनी परदेशी पैशात भारतीयांचा घाम मिसळला असला पाहिजे असेही म्हटले होते परंतु टेस्ला गाडी तर पूर्णपणे आयात केलेली आहे, त्यात भारतीयांचा घामही नाही.

कालपर्यंत माय फ्रेंड डोनाल्ड ट्रंप, नमस्ते ट्रंप, अबकी बार ट्रंप सरकार, हाऊडी ट्रंप म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी नारा बदलून सध्या हिंदी चिनी भाई भाई चा नारा दिला आहे याचीही जाणीव शिवसेनेला नाही. त्यामुळे महायुती की जेल में सुरंग लावण्याचे काम आता मित्रपक्षच करत आहेत असा मिश्किल टोला सावंत यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला असला तरी ते स्वतः मात्र विदेशी आणि महगाड्या वस्तू वापरतात. नरेंद्र मोदी जर्मन बनावटीची BMW कार वापरतात, इटालियन बनावटीचा Giorgio Armani सूट वापरतात. केनेथ कोल या अमेरिकन कंपनीचे बूट वापरतात, इटालियन कंपनीचे घड्याळ, कॉपर व्हिजन या अमेरिकन कंपनीचा चष्मा आणि अमेरिकेचा आयफोन वापरतात. ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात. एवढेच काय ते खातात ते मशरूमही विदेशातून येते अशी चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांचा स्वदेशीचा नारा म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण”, असा प्रकार आहे असे सचिन सावंत म्हणाले.

Web Title: Congress leader sachin sawant has criticized minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Pratap Saranaik
  • sachin sawant
  • Tesla Car

संबंधित बातम्या

‘आमच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावे अशी आमची इच्छा आहे’, पुतिनच्या मंत्र्यांनी भारताचा उल्लेख करून असे ‘का’ म्हटले?
1

‘आमच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावे अशी आमची इच्छा आहे’, पुतिनच्या मंत्र्यांनी भारताचा उल्लेख करून असे ‘का’ म्हटले?

Vice President Election : भाजपच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदी दिसले चक्क शेवटच्या रांगेत; चर्चांना उधाण
2

Vice President Election : भाजपच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदी दिसले चक्क शेवटच्या रांगेत; चर्चांना उधाण

जागतिक राजकारणाचे वारे नक्की कोणत्या दिशेला? ट्रम्प म्हणाले ‘कायमचे मित्र’, मोदीजींनीही दिले ‘असे’ धडाकेबाज उत्तर
3

जागतिक राजकारणाचे वारे नक्की कोणत्या दिशेला? ट्रम्प म्हणाले ‘कायमचे मित्र’, मोदीजींनीही दिले ‘असे’ धडाकेबाज उत्तर

अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती अन् PM Narendra Modi ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
4

अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती अन् PM Narendra Modi ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.