congress melava in kalyan they dont know which is the death anniversary day of rajiv gandhi everyone is shocked nrvb
कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra State President Nana Patole) यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा मेळावा (Congress Meeting) पार पडला. मात्र या मेळाव्या दरम्यान काँग्रेसच्या एका नेत्याने अकलेचे तारे तोडले आहेत. कल्याण जिल्हा प्रभारी आणि प्रदेश सचिव राजन भोसले (Rajan Bhosale) यांच्या भाषणा (Speech) दरम्यान “आजचा दिवस महान आहे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे.” (Former Prime Minister Rajiv Gandhi’s death anniversary) अशी सुरुवात केली. मात्र महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी (Kanchan Kulkarni)यांनी त्यांना हटकले. हे ऐकून मंचावर बसलेले नाना पटोले यांच्यासह नेते आणि पदाधिकारी हैराण झाले.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 21 June 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/daily-horoscope-21-june-2023-today-rashibhavishya-in-marathi-scorpio-will-enjoy-family-events-post-prestige-will-remain-dont-argue-unnecessarily-nrvb/”]
कल्याणमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीने अत्रे रंगमंदिरात पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित होते. या मेळाव्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. सभागृह खच्चून भरले होते. यावेळी कल्याण जिल्हा प्रभारी आणि प्रदेश सचिव राजन भोसले यांनी भाषणाला सुरुवात केली.
[read_also content=”आता 2000 च्या नोटा बदलून द्यायला घरी येणार Amazon https://www.navarashtra.com/web-stories/now-amazon-will-come-home-to-exchange-rs-2000-currency-notes-nrvb/”]
“मित्रांनो आज आपल्याकडे महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी राजीव गांधी यांची हत्या झाली होती. राजीव गांधी यांचा आज स्मृती दिवस असल्याने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. अशा दूरदृष्टी नेत्यामुळेच..” असे बोलत असताना महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, आज स्मृती दिन नाही. तत्पूर्वी भोसले यांनी त्यांची चूक सुधारत राजीव गांधी यांचा स्मृती दिन २१ मे रोजी असतो असे सावरुन घेतले. काँग्रेसच्या प्रदेश सचिवाला राजीव गांधीचा स्मृती दिन कोणता हे माहिती नसल्याने मंचावरील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते हैराण झाले. प्रदेश सचिव भोसले यांनी त्यांच्या भाषणात अकलेचे तारे तोडल्याने त्यांचे हे भाषण चर्चेचा विषय झाले आहे.