Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्रावरील गद्दारीचा डाग ही अमित शाहांची देण…’; पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये अमित शाह यांनी कॉंग्रेस व महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. आता कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 09, 2024 | 05:16 PM
Congress Prithviraj Chavan reeplies to bjp amit shah

Congress Prithviraj Chavan reeplies to bjp amit shah

Follow Us
Follow Us:

कराड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्लीचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौैऱ्यावर आले होते. त्यांनी प्रचारामधून कॉंग्रेस व महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. अमित शाह यांच्या टीकेला आता कॉंग्रेसकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे. महाराष्ट्राची गद्दारांचे राष्ट्र अशी झालेली ओळख ही अमित शहांची देण आहे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला.

विंग (ता. कराड) येथील एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. त्यावर प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल आमदार पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले, एकेकाळी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न पहिल्या क्रमांकावर होते. ते सध्या 11 व्या क्रमांकावर आहे. याला दहा वर्षांतील महायुती सरकारची सुमार कामगिरीच जबाबदार आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, दिल्ली, गोवा ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. हे चुकीचे असल्यास त्यांनी सांगावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात ते कबूल केले आहे. त्याचा व्हिडिओ शहांनी पहावा आणि मग विकासाच्या बाता माराव्यात.

हे देखील वाचा : धक्कादायक! निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजप नेत्याची हत्या, मिरजमध्ये उडाली खळबळ

पुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात सध्या सुशिक्षित, बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. शाह आणि त्यांच्या नेत्यांनी सगळे उद्योग गुजरातला पळवले आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस तोंडाला पट्टी बांधून गप्प राहिले. मुंबई-अहमदाबाद ही सव्वालाख कोटींची बुलेट ट्रेन केली. याची कोणी मागणी केली होती. केवळ गुजरातला महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवण्यासाठी हा उद्योग त्यांनी केला. यासाठी कराड-चिपळूण हा मंजूर झालेला रेल्वे प्रकल्प रद्द करून त्याचा निधी बुलेट ट्रेनकडे वळवण्यात आला. अमित शाह यांनी उपस्थित केलेल्या 370 कलम, वक्फ बोर्ड, जम्मू-काश्मीरचा प्रश्न या मुद्द्यांचाही त्यांनी समाचार घेतला.

कॉंग्रेसबाबतचे वक्तव्य हास्यास्पद

काँग्रेसने सत्ता काळात काय केले? असे अमित शहा यांच्यासारख्या एका जबाबदार व्यक्तींनी केलेले वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, यावर खरंच बोलायचे असेल, तर मी मनमोहन सिंग सरकारने काय केले, ते सांगतो. त्यासाठी समोरासमोर या!, असे खुले आव्हानही पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाह यांना दिले.

हे देखील वाचा : महाराष्ट्र हा गुजरातला आंदण देणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवा…; जयंत पाटलांचा एल्गार

विकासकामे हवेतून पडली का?

ते म्हणाले, “कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात तब्बल ७०० कोटींचे भूकंप संशोधन केंद्र मी आणले. स्वतंत्र आरटीओ कार्यालय, प्रशासकीय इमारत, कराडचे बस स्थानक आदी कामे हवेतून पडली? की ती अमित शहा यांनी आणली?” असा टोलाही आमदार चव्हाण यांनी शहा यांना लगावला. “मी मुख्यमंत्री असताना कराडमधील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव नागरिकांसमोर मांडला होता. परंतु, तो त्यांनी स्वीकारला नाही. कराडला नगराध्यक्षा भाजपच्या होत्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचा होता. केंद्रात पंतप्रधानही भाजपचेच होते. असे असताना तुम्ही का निर्णय घेतला नाही?” असा प्रतिसवालही आमदार चव्हाण यांनी शहा यांना केला.

Web Title: Congress prithviraj chavans strong response to bjp amit shahs criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 05:15 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

PM Narendra Modi: भाजप संघटना आणि मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल होणार; अमित शाह, जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत ‘हायप्रोफाईल’ बैठक
1

PM Narendra Modi: भाजप संघटना आणि मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल होणार; अमित शाह, जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत ‘हायप्रोफाईल’ बैठक

साखर उद्योगाला केंद्र सरकारचा मोठा दिलासा, मागण्यांबाबत 10 दिवसांत निर्णय घेणार; अमित शहांची ग्वाही
2

साखर उद्योगाला केंद्र सरकारचा मोठा दिलासा, मागण्यांबाबत 10 दिवसांत निर्णय घेणार; अमित शहांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.