Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khopoli News: खोपोली नगरपरिषदेला ४ बिल्डरकडून लाखोंचा चुना; पोलिस तपास सुरू

बांधकाम परवानगी रद्द झाल्याचे पत्र मिळताच या विकासकानी खोपौली पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी सर्व पूर्तता करीत योग्य ते परवानगी शुल्क भरले असतानाही फसवणूक झाली असल्याची तक्रार दिली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 14, 2026 | 10:59 AM
Khopoli News: खोपोली नगरपरिषदेला ४ बिल्डरकडून लाखोंचा चुना; पोलिस तपास सुरू
Follow Us
Close
Follow Us:
  • विकासकांनी बांधकाम परवानगीसाठीची काही रक्कम ऑनलाईन भरली
  • उर्वरित मोठी रक्कम रोख भरल्याचे भासवून त्याच्या बनावट पावत्या प्रशासनाला सादर केल्या.
  • हा संपूर्ण प्रकार २०२२ ते २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत घडला
  • संशय आल्यानंतर प्रशासनाने कागदपत्रे मागवूनही विकासकांनी त्याची पूर्तता केली नाही.
Khopoli News: खोपोली खोपोली नगरपरिषदेत बांधकाम परवानगी घेताना जे शुल्क भरावे लागते ते शुल्क न भरता भरल्याच्या खोट्या पावत्या प्रशासनाला सादर करून खोपोलीमधील चार विकासकांनी नगरपरिषदेची फसवणूक केल्याची घटना घडल्याची माहिती खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली आहे.

२०२२ व २०२३ या कालावधी मध्ये हा घोटाळा झाल्याचे नगरपरिषदेच्या नगर रचना विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित चारही बिल्डर्सकडून सर्व माहिती व कागदपत्रे मागवण्यात आले, पण त्यांची पूर्तता त्यांनी न केल्याने व सादर केलेल्या पैसे भरलेल्या पावत्या बनावट असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांची तत्कालीन बांधकाम परवानगी रद्द करीत त्याबाबत गुन्हा दाखल करावा, असे पत्र नगरपरिषदेच्या नगररचना विभागाने खोपोली पोलिस ठाण्यास दिले.

Beed Crime: ‘बाजूला हो’ म्हणल्याचा राग; बीडमध्ये हॉटेल वेटरला अमानुष मारहाण, CCTV समोर

खोट्या पावत्या केल्या सादर

बांधकाम परवानगी रद्द झाल्याचे पत्र मिळताच या विकासकानी खोपौली पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी सर्व पूर्तता करीत योग्य ते परवानगी शुल्क भरले असतानाही फसवणूक झाली असल्याची तक्रार दिली. या चार विकासकांपैकी एक खोपोलीमधील नामवंत विकासक आहे. एका विकासकाचा नातेवाईक विद्यमान नगरसेवक असून एक आआग्रगण्य शिक्षण संस्थेत संचालक आहे.

एक विकासक बाजारपेठेतील व्यापारी आहे. या फसवणुकीच्या प्रकाराची माहिती खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दै. नवराष्ट्रला देताना सांगितले की, तपासात या विकासकांनी परवानगीची काही रक्कम ऑनलाईन भरली व काही रक्कम रोख भरल्याचे दाखवत त्याच्या पावत्या खोट्या सादर केल्या आहेत.

अद्याप एफआयआर दाखल नाही

खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शैडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. हे घोटाळा प्रकरण २०२२ व २०२३ या कालावधीत घडले होते. त्याची माहिती प्रशासनाने त्याना दिली असता या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत पोलिस ठाण्यात चौकशी केली असता अद्याप कोणतीच एफआयआर दाखल झाली नसून त्या चार विकासकांनी ही आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली असून हा आर्थिक फसवणूकीचा गुन्हा असल्याने आम्ही तपास करीत आहोत व त्यानंतर योग्य ती कारवाई करू, असे खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी सांगितले.

8th Pay Commission: बेसिक सॅलरी ३४ हजारांच्या पार? ८ व्या वेतन आयोगातील ‘फिटमेंट फॅक्टर’ ठरणार गेम चेंजर

घटनाक्रम असा

चार बिल्डरांनी पैसे न भरता खोट्या पावत्या जमा करून प्रशासनाची फसवणूक केल्याचा नगरपरिषदेचा आरोप

चारही बिल्डरांच्या बांधकाम परवानग्या रद्द: चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी नगरप्रशासनाचे पोलिसांना पत्र बांधकाम परवानगी रद्द होताच बिल्डरांनीही
खोपोली पोलिस ठाण्यात त्यांची फसवणूक झाल्याची केली तक्रार

 

 

Web Title: Construction permit scam in khopoli 4 developers accused of submitting fake receipts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Financial Scam
  • Khopoli
  • nagar parishad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.