नाला ओलांडताना मुख्याध्यापकाचा मृत्यू; दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह
पिंपरी : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काम चालू असताना दोन कामगार खाली पडले. त्यातील एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. चंद्रकांत यशवंत सुतार (वय ५३, रा. वडगाव रोड, आळंदी) यांचा मृत्यू झाला तर निरहार भिमन्ना मेलकेरी (४३, रा. चह्योली (बु) ता. हवेली) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अरविंद सोळंकी यांच्या चऱ्हाेली-आळंदी रोड, आळंदी येथील साईटवर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदाराने इमारतीच्या बाहेरील बाजूने मजुराच्या व पादचाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी संरक्षण जाळी लावली नाही. मजुरांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून डोक्याला हेल्मेट व हर्नेस दिले नाही आणि त्यांच्या जीविताची योग्य ती खबरदारी न घेतल्याने व निष्काळजीपणा केल्याने हा प्रकार घडला.
हेदेखील वाचा : Pimpri News : कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या खाजगी बसची एसटीला जोरदार धडक; 13 जण जखमी
आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल दुधमल यांनी आरोपी अब्दुलगफार अब्बास राय (वय ५२ वर्षे रा. चर्होली खुर्द घोलपवस्ती ता खेड जि पुणे) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झाली नाही.
पुण्यातीही कोंढव्यातही घडली होती घटना
यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. पुण्यातील कोंढवा भागात सुरू असलेल्या बहुमजली बांधकाम इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमधून खाली पडून एका मजूराचा मृत्यू झाला होता. ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा नोंदवला आहे. सनी डाक्टर सोनी (वय १९, रा. टिळेकरनगर) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात डॉक्टर सोनी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Dhule News : अण्णासाहेब पाटील महामंडळात लाचखोरीचा प्रकार; व्याज परताव्यासाठी केली लाचेची मागणी; जिल्हा समन्वयक अटकेत