Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सातारा नगरपरिषदेला कूपर कॉर्पोरेशनचा सीएसआरमधून ट्रॅक्टर; स्वच्छता व हरित उपक्रमांना चालना

कूपर कॉर्पोरेशनने सातारा नगरपरिषदेला स्वच्छतेसाठी ट्रॅक्टर भेट दिला आहे. फरोख कूपर आणि अमोल मोहिते यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 16, 2026 | 05:19 PM
सातारा नगरपरिषदेला कूपर कॉर्पोरेशनचा सीएसआरमधून ट्रॅक्टर

सातारा नगरपरिषदेला कूपर कॉर्पोरेशनचा सीएसआरमधून ट्रॅक्टर

Follow Us
Follow Us:

 

  • सातारा नगरपरिषदेला कूपर कॉर्पोरेशनचा सीएसआरमधून ट्रॅक्टर
  • स्वच्छता व हरित उपक्रमांना चालना
सातारा, दि. १६ (प्रतिनिधी): शहरातील स्वच्छता आणि हरित विकासकामांना गती देण्यासाठी कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि., सातारा यांनी आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत सातारा नगरपरिषदेला ट्रॅक्टर प्रदान केला. या ट्रॅक्टरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कंपनीचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर फरोख कूपर व डायरेक्टर जाल कूपर यांच्या हस्ते नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर यांच्याकडे ट्रॅक्टरची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी ट्रॅक्टरचे पूजन नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर यांनी फरोख कूपर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कूपर कॉर्पोरेशनच्या वतीनेही नगरपरिषद पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Maharashtra Politics : साताऱ्यात महायुतीतच चुरस; जिल्हा परिषद राजकारण तापले

मनोगतात बोलताना नगराध्यक्ष मोहिते म्हणाले की, कूपर कॉर्पोरेशनने साताऱ्याच्या विकासासाठी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत योगदान दिले असून, शहराला गरज भासल्यास कंपनी नेहमी पुढाकार घेते.

या प्रसंगी कूपर कॉर्पोरेशनचे डायरेक्टर असलम फरास, आर्थिक दुर्बल घटक समितीचे सभापती संकेत साठे, नगरपरिषदेचे वृक्ष विभाग प्रमुख दिग्विजय गाढवे तसेच कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सीएसआर अंतर्गत मिळालेला हा ट्रॅक्टर शहरातील झाडांना पाणी देणे, रोड डिव्हायडरमधील वृक्षांची देखभाल आणि स्वच्छता कामांसाठी उपयुक्त ठरणार असून, त्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत

Web Title: Cooper corporation donates tractor to satara municipal council csr initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार – डॉ. प्रिया शिंदे
1

एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार – डॉ. प्रिया शिंदे

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा
2

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
3

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक
4

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.