Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनेलने सुरुवातीपासूनच आघाडी कायम राखत दणदणीत विजय मिळवला. मतमोजणी केंद्रासह कारखाना परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.

  • By विवेक
Updated On: Jun 23, 2026 | 08:42 PM
‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा

Follow Us
Follow Us:

कराड/प्रतिनिधी : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनेलने सुरुवातीपासूनच निर्णायक आघाडी घेतल्याने मतमोजणी केंद्र परिसर मंगळवारी अक्षरशः गुलालमय झाला. मतमोजणीत वाढत जाणारी आघाडी पाहून समर्थकांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि दुपारपासूनच विजयाचा जल्लोष सुरू झाला.

पहिल्या फेरीत सहकार पॅनलने संस्थापक पॅनेलवर सरासरी ७४३३ मतांची मोठी आघाडी घेतली. हाच ट्रेंड दुसऱ्या फेरीतही कायम राहिला. सायंकाळी उशिरा दुसऱ्या फेरीअखेर सहकार पॅनेलने सरासरी १५००० च्या मताधिक्याने विजयी झाले. दरम्यान,

निर्णय आघाडीनंतर आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत कृष्णा कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्ते, समर्थकांनी भव्य विजयी जल्लोष साजरा केला. दरम्यान, विजयी मतांची अधिकृत आकडेवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत हाती आली नव्हती.

वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू असताना सुरुवातीच्या राखीव गटांतील निकालांमध्येच सहकार पॅनेलने वर्चस्व सिद्ध केले. यानंतर कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करत गुलालाची उधळण, घोषणाबाजी आणि झेंडे फडकावत विजयाचा उत्सव सुरू केला.

राजाभाऊ राऊतांच्या विजयाने बार्शीत जल्लोषाचा महास्फोट! फटाक्यांची आतषबाजीत भाजप – महायुती कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी

अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती आणि इतर मागास प्रवर्ग या राखीव गटांतील मतमोजणीत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे उमेदवार सातत्याने आघाडीवर राहिले. विरोधी कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील आणि उमेदवार सौ. अर्चनाताई मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनलच्या उमेदवारांनी अपवाद वगळता सुरुवातीपासूनच्या मतांमध्ये मोठी आघाडी घेतली नाही. त्यामुळे या निर्णायक निकालाने समर्थकांमध्ये विजयाची खात्री निर्माण झाली आणि परिसरात जल्लोषाला सुरुवात झाली.

सायंकाळी महिला राखीव गट व सर्वसाधारण गटातील मतमोजणीला वेग आल्यानंतर सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू ठेवली. त्यानंतर कार्यकर्ते, सभासद आणि समर्थकांचा आनंद अक्षरशः ओसंडून वाहू लागला. मतमोजणी केंद्रासह कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कृष्णा कारखाना परिसरात मोठी गर्दी जमली होती. गुलालाच्या उधळणीबरोबरच फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दणाणून गेला.

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास चेअरमन डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुल भोसले विजयी उमेदवारांसह मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच सहकार पॅनलच्या या विजयाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून सभासदांचे आभार मानले.

निवडणूक विभाग व पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन

निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरुवातीपासून शांततेत व सुरळीत पार पडली. तसेच पोलीस प्रशासनानेही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनीही मतमोजणी केंद्र परिसरातील वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने संभाव्य वाहतूक कोंडी आणि नागरिकांचा होणारा त्रास टाळण्यात त्यांना यश आले.

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

विजयाच्या जल्लोषात वरुणराजाचीही साथ

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान वरुणराजानेही आपली हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. जून महिना संपत आला तरी पावसाने अपेक्षित जोर न धरल्याने ऊस लागणीबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र दुपारी सुमारे पावणे एकच्या सुमारास झालेल्या पावसाच्या सरींमुळे शेतकरी वर्ग सुखावला. विजयाच्या जल्लोषात निसर्गानेही आनंदाची भर घातल्याची भावना कार्यकर्त्यांत व्यक्त होत होती.

विजयाचा पहिला गुलाल…

मतमोजणीच्या सुरुवातीलाच अनुसूचित जाती-जमाती राखीव गटातील निकालांमध्ये सहकार पॅनेलने मोठी आघाडी घेतली. सुमारे साडेसात हजार मतांची आघाडी स्पष्ट होताच उमेदवार छबन कांबळे यांच्या समर्थकांनी सर्वप्रथम पोत्याने गुलाल उधळत विजयाच्या घोषणा दिल्या. याच क्षणापासून सहकार पॅनेलच्या विजय उत्सवाला प्रारंभ झाला आणि हा गुलाल संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील ‘पहिला विजयाचा गुलाल’ ठरला.

Web Title: Krishna sugar factory election sahakar panel victory celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Karad
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
2

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
3

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
4

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.