Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनाचे पुन्हा थैमान! कृषीमंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह

कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्याचा नवीन उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’ने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवलेली असताना देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ‘जेएन.१’ने बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • By Aparna
Updated On: Dec 24, 2023 | 06:24 PM
कोरोनाचे पुन्हा थैमान! कृषीमंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह
Follow Us
Close
Follow Us:

कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्याचा नवीन उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’ने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवलेली असताना देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ‘जेएन.१’ने बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. दरम्यान, देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे.अशातच आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनादेखील करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः मुंडे यांनी फेसबूक आणि एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे.

काय म्हणाले मुंडे?

नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. — Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 24, 2023

धनंजय मुंडे यांनी फेसबूकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी कोव्हिड-१९ तपासणी केली असता पुन्हा एकदा कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. मला सध्या फारसा त्रास नाही, परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी मागील चार दिवसांपासून क्वारन्टाईन (विलगीकरण कक्षात) राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईन.

सध्या थंडीचं वातावरण असून कोव्हिडच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला मुंडे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.

दरम्यान, संपूर्ण भारतात शुक्रवारी (२२ डिसेंबर) दुपारपर्यंत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले होते. एकट्या केरळ राज्यात २६५ करोनाबाधित रुग्ण सापडले होते. तसेच एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यूदेखील झाला होता. त्यापाठोपाठ शनिवारीदेखील देशभरात शेकडो नवे रुग्ण आढळले. देशभरात शनिवारी एका दिवसात ७५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे आणि चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३,४२० करोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहे. यापैकी ५६५ रुग्ण एकट्या केरळ राज्यात आहेत. महाराष्ट्रातही शनिवारी १९ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Corona again agriculture minister dhananjay munde s test positive 752 patients recorded in one day across the country nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2023 | 06:20 PM

Topics:  

  • Corona Virus
  • dhananjay munde
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
2

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
3

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.