Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठ्ठल मूर्ती लेपनाचा मार्ग मोकळा; न्यायालयाने स्थगितीची मागणी फेटाळली. 23-24 जूनला लेपन प्रक्रिया निश्चित

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील लेपन प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली. 23 व 24 जून रोजी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन प्रक्रिया पार पडणार आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 21, 2026 | 09:03 PM
विठ्ठल मूर्ती लेपनाचा मार्ग मोकळा; न्यायालयाने स्थगितीची मागणी फेटाळली. 23-24 जूनला लेपन प्रक्रिया निश्चित

विठ्ठल मूर्ती लेपनाचा मार्ग मोकळा; न्यायालयाने स्थगितीची मागणी फेटाळली. 23-24 जूनला लेपन प्रक्रिया निश्चित

Follow Us
Follow Us:

पंढरपूर / शिवाजी हळणवर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील प्रस्तावित लेपन प्रक्रियेला विरोध करणाऱ्या याचिकेला जिल्हा न्यायालयाने नकार दिल्याने मंदिर समितीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने स्थगिती अर्ज फेटाळल्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली 23 व 24 जून रोजी मूर्ती संवर्धनाची लेपन प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.

पंढरपूर येथील भीमाचार्य बाळाचार्य वरखेडकर यांनी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर करण्यात येणाऱ्या लेपन प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती मेटकरी व न्यायमूर्ती सलगर यांनी स्थगिती अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे मंदिर समितीने आखलेली संवर्धन प्रक्रिया राबविण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय मंदिर महासंघाचे गणेश लंके यांनीही मूर्तीवर रासायनिक लेपन न करता पारंपरिक आयुर्वेदिक व्रजलेप करण्यात यावा, या मागणीसाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून सोमवारी (ता. 22) अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे रवाना; ७०० वारकरी १,३०० किमींची पायी वारी करणार

श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची कालांतराने झीज झाल्याचे निरीक्षण भारतीय पुरातत्त्व विभागाने नोंदवले असून मूर्तीचे जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष लेपन प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

लेपन प्रक्रियेदरम्यान मंदिरातील कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी दोन दिवस भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 23 व 24 जून रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

Ashadhi Wari 2026: पंढरी वारीतील अनोळखीवर वॉच! सुरक्षा कलम १६३ लागू; भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, न्यायालयाकडून कोणतीही स्थगिती किंवा मनाई आदेश देण्यात आलेला नसल्याने नियोजित कार्यक्रमानुसार लेपन प्रक्रिया होणार आहे. तसेच मंदिर समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शिफारशींसह ऑर्गॅनिक पद्धतीचाही वापर या प्रक्रियेत केला जाणार आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती संवर्धनाचा विषय पुन्हा चर्चेत आला असून, वारकरी, भाविक आणि विविध धार्मिक संघटनांचे लक्ष आता सोमवारी होणाऱ्या अंतिम सुनावणीकडे लागले आहे. मात्र सध्याच्या घडीला विठुरायाच्या मूर्तीवरील लेपन प्रक्रियेस कोणताही कायदेशीर अडथळा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Court rejects stay for application of protective coating to vitthal idol pandharpur temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • pandharpur
  • vitthal mandir

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.