पंढरी वारीतील अनोळखीवर वॉच! सुरक्षा कलम १६३ लागू; भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक
यंदाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून संभाव्य दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात कलम १६३ लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात नव्याने राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला देणे नागरिकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षकांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. पंढरपूर येथे १९ जुलै ते २९ जुलैदरम्यान आषाढी यात्रा भरत असून २४ जुलै (दशमी), २५ जुलै (देवशयनी आषाढी एकादशी) आणि २९ जुलै (पौर्णिमा) हे यात्रेचे प्रमुख दिवस आहेत. वारीदरम्यान लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण येतो.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर – Navarashtra
देशातील विविध धार्मिक, पर्यटन आणि केली उपाययोजना संस्थांच्या विश्वस्तांना स्पष्ट सूचना दिल्या महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी कारवायांचे, वाढते प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. दहशतवादी स्थानिकांमध्ये मिसळून तात्पुरत्या वास्तव्याचा वापर घातपाती कारवायांसाठी करतात, असे पूर्वीच्या घटनांमधून समोर आले असल्याने यंदा विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. प्रशासनाने घरमालक, प्रॉपटी डिलर, ब्रोकर, एजंट, लॉज चालक तसेच मशीद, चर्च, धर्मशाळा आणि इतर धार्मिक आहेत. त्यांच्या परिसरात राहण्यासाठी आलेल्या अनोळखी व्यक्तीची सपूर्ण संबंधित आषाढी वारीच्या कालावधीत फ्लॅट, लॉज, मठ, धर्मशाळा, चर्च, मशीद, मंदिर आणि खासगी निवासस्थानी कोणत्याही देणे आवश्यक राहणार आहे. तसेच अनोळखी व्यक्तीस ओळखपत्रांची पडताळणी केल्याशिवाय राहण्यास परवानगी देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Ashadhi Wari 2026 : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विठुरायाच्या …
भाडेकरूंकडून ओळखपत्र व रहिवासी पुराव्यांच्या छायांकित प्रती घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्फोटक पदार्थ, बार उडविणारे साहित्य तसेच पेट्रोल, डिझेल, गॅस आणि रॉकेल यांसारख्या ज्वलनशील पदार्थांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पंढरपूर परिसर ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. नागरी सुरक्षा कायदा २०२३ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून परवानगीशिवाय ड्रोन उडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.






