Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renewable Energy क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार…; काय म्हणाले CM Fadnavis?

Renewable Energy : भारत मंडपम येथे २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या परिषदेत महाराष्ट्र ‘पार्टनर स्टेट’ म्हणून सहभागी झाला होता. ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संकल्पनेवर आधारित राज्याच्या ऊर्जा दालनाला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2026 | 09:15 PM
नवीकरणीय ऊर्जेतील कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार

नवीकरणीय ऊर्जेतील कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार

Follow Us
Follow Us:
  • नवीकरणीय ऊर्जेतील कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार
  • सर्वसाधारण श्रेणीत देशात दुसरा क्रमांक, उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
  • राष्ट्रीय पुरस्कार ही राज्यासाठी अभिमानाची बाब – फडणवीस 
नवी दिल्ली/ Renewable Energy: नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद व प्रदर्शन २०२६’च्या समारोप सत्रात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी अभिनंदन केले.

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. या यशासाठी योगदान देणाऱ्या ऊर्जा विभागासह सर्व संबंधित संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन. राज्यात स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या प्रयत्नांना या गौरवामुळे आणखी बळ मिळेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘नवीकरणीय ऊर्जा राज्य मूल्यांकन आराखड्या’अंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील राज्यांमध्ये महाराष्ट्राने गुजरातनंतर दुसरा क्रमांक मिळविला. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही घोषणा केली.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने मंत्रालयाने हा मूल्यांकन आराखडा विकसित केला आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेतील वाढ, धोरणात्मक व नियामक व्यवस्था, वीज ग्रिडची सज्जता, वीज वितरण कंपन्यांची कामगिरी आणि गुंतवणुकीसाठीचे वातावरण या निकषांवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले.

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

नवीकरणीय ऊर्जा विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या राज्य शासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची या पुरस्काराने दखल घेतली आहे. जीवाश्म इंधनांव्यतिरिक्त इतर स्रोतांवर आधारित वीजनिर्मितीची स्थापित क्षमता २०३० पर्यंत ५०० गिगावॅटपर्यंत नेण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात महाराष्ट्राच्या उपक्रमांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मंत्रालयाने नमूद केले. राज्याचा अनुभव आणि यशस्वी उपक्रम इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास मंत्रालयाचे सचिव संतोष सारंगी यांनी व्यक्त केला.

गडकिल्ल्यांच्या संकल्पनेतून हरित ऊर्जेचे दर्शन

भारत मंडपम येथे २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या परिषदेत महाराष्ट्र ‘पार्टनर स्टेट’ म्हणून सहभागी झाला होता. ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संकल्पनेवर आधारित राज्याच्या ऊर्जा दालनाला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी या दालनातून मांडण्यात आली.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. आणि महाऊर्जाचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा यांच्या सहकार्याने महाऊर्जा या संस्थेने हे दालन उभारले.

Mumbai Sanitation Workers Housing Scheme : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मुंबईतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं!

हरित ऊर्जा प्रकल्पांची आभासी सफर

दालनातील ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी झोन’ अभ्यागतांसाठी विशेष आकर्षण ठरला. या माध्यमातून घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प आणि सिन्नर सौर ऊर्जा प्रकल्पाची आभासी सफर अनुभवता आली. मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० आणि ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेची माहितीही या माध्यमातून देण्यात आली. दृकश्राव्य आणि संवादात्मक डिजिटल सादरीकरणांसह दालनातील सेल्फी बूथलाही अभ्यागतांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात सर्वसाधारण श्रेणीत महाराष्ट्राने देशात दुसरा क्रमांक मिळविला, हे राज्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. या कामगिरीत योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. सौर ऊर्जेसह विविध नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती देण्यावर आमचा भर राहील असे अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्राला कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे?

    Ans: नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

  • Que: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    Ans: महाराष्ट्राला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: Cp radha krishnan awarded to maharashtra for renewable energy cm devendra fadnavis tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • C. P. Radhakrishnan
  • CM Devendra Fadnavis
  • renewable energy

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा
1

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश
2

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश

Mumbai Sanitation Workers Housing Scheme : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मुंबईतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं!
3

Mumbai Sanitation Workers Housing Scheme : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मुंबईतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं!

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा
4

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.