
BMC Sanitation Worker
मुंबई : मुंबईची स्वच्छता राखण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना केवळ सेवा निवासस्थानच नाही, तर मालकी हक्काने घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. कुलाब्यातील पंचशील नगर येथे 140 सदनिकांच्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि चावीवाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. (Mumbai Sanitation Workers Housing Scheme)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वच्छता कर्मचारी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यामुळे त्यांना चांगलं आणि प्रशस्त घर उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थानासोबत मालकी हक्काने घरं देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आणि वाल्मिकी गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना घरांची सुविधा दिली जात आहे. 2028 पर्यंत सेवा निवासस्थान उपलब्ध करून देण्याचंही नियोजन आहे.
कुलाब्यातील पंचशील नगर येथे दोन इमारतींमध्ये एकूण 140 सदनिका बांधण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेने पहिल्यांदाच प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर करून ही इमारत उभारली आहे. या इमारतींमध्ये लिफ्टसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, मुंबई महापालिकेच्या 29 हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना दर्जेदार निवासस्थान उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. आधी 150 चौरस फुटांचं घर मिळत होतं, आता 300 चौरस फुटांचं घर देण्यात येत आहे.
आश्रय योजनेंतर्गत 30 वसाहतींचा 35 प्रकल्पांच्या माध्यमातून तीन टप्प्यांत पुनर्विकास केला जाणार आहे. यामध्ये 300 चौरस फुटांची 11,371 आणि 600 चौरस फुटांची 773 घरे अशी एकूण 12,144 घरे उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर आणि वकील व्हावं, यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला दिले आहेत.
Ans: मुंबई महापालिकेच्या सुमारे 29 हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थान उपलब्ध करून देण्याचं शासनाचं नियोजन आहे. यासोबतच मालकी हक्काने घरे देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.
Ans: कुलाब्यातील पंचशील नगर येथे दोन इमारतींमध्ये बांधण्यात आलेल्या 140 सदनिकांचं उद्घाटन करण्यात आलं. यातील कर्मचाऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं.
Ans: मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेंतर्गत एकूण 12,144 घरं उभारण्याचं नियोजन आहे. यामध्ये 300 चौरस फुटांची 11,371 आणि 600 चौरस फुटांची 773 घरं असतील.