Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 107 व्या सभेत राडा; सभेपूर्वी प्रतिसभा, महिला शिक्षिकेला भोवळ

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सभेपूर्वीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने बँकेच्या कारभाराविरोधात प्रतिसभा घेण्यात आली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 02, 2026 | 03:50 PM
Ahilyanagar News: जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 107 व्या सभेत राडा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ahilyanagar News: जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 107 व्या सभेत राडा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगर शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सभा वादळी ठरली.
  • कंत्राटी नोकरभरतीविरोधात सभेपूर्वी प्रतिसभा घेण्यात आली.
  • शिक्षक संघाने संचालक मंडळाच्या कारभारावर विरोध दर्शवला.
AhilyaNagar News: अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. अहिल्यानगर या संस्थेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी वादळी ठरली. सभा सुरू होण्यापूर्वीच बँकेबाहेर प्रतिसभा भरवण्यात आली, तर सभा सुरू झाल्यानंतर आतमध्ये कंत्राटी नोकरभरती आणि व्याजदराच्या मुद्द्यांवरून जोरदार राडा झाला.

सभेपूर्वीच मैदानावर प्रतिसभा-

संचालक मंडळाच्या कारभाराविरोधात आणि ‘हुकूमशाही’ कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सभेच्या ठिकाणाबाहेरील मैदानात प्रतिसभा घेण्यात आली. मागील आठवड्यात सभासदांनी बँकेबाहेर उपोषण करून नियमांना डावलून सुरू केलेली नोकरभरती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, चेअरमन आणि सत्ताधारी संचालक मंडळाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रतिसभा घेऊन तीव्र विरोध दर्शवण्यात आला.

सभेत घोषणाबाजी आणि घोषणांचा गदारोळ-

वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. अनेक सभासद शिक्षकांनी हातात फलक घेऊन सभास्थानीच निदर्शने सुरू केली. “कंत्राटी नोकरभरती रद्द झालीच पाहिजे” आणि “व्याजदर ७ टक्के झाला पाहिजे,” अशा जोरदार मागण्या करत शिक्षकांनी सभागृह डोक्यावर घेतले. या वेळी काही शिक्षक परस्परांवर धावून गेले असून त्यांच्यात अरेरावीची भाषा आणि शब्दांची चकमक उडाली.

महिला संचालकाच्या वक्तव्याने वातावरण तापले-

सभेत वक्तव्य करत असताना एका महिला संचालकाने विरोध करणाऱ्या सभासदांचा उल्लेख “चिमूटभर महिला सभासदांचा विरोध” असा केला. या शब्दामुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापले आणि महिला शिक्षकांनी आक्रमक होत जोरदार गोंधळ घातला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून शेवटी संबंधित महिला संचालकाने तो शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरीनंतरही सभेत वारंवार गोंधळ सुरूच राहिला.

Ahilyanagar News: युवा शेतकऱ्यांसाठी रोजगाराची नवी दिशा – Navarashtra

महिला संचालकाचे विधान अन महिला शिक्षिकेला भोवळ-

सभेत बोलताना एका महिला संचालकाने विरोध करणाऱ्यांचा उल्लेख “चिमूटभर महिला सभासदांचा विरोध” असा केल्याने सभागृहातील महिला शिक्षिका प्रचंड आक्रमक झाल्या. यामुळे झालेल्या अभूतपूर्व गोंधळात आणि प्रचंड गदारोळामुळे एका महिला शिक्षिकेला भोवळ आल्याचा प्रकार घडला.

School Violence: शाळेत धक्कादायक प्रकार! 8 वर्षांच्या चिमुकल्याला …

गुरूऊमाली गुरुकुल संघटना यांच्या मागण्या :-

  • बाहेरच्या जिल्ह्यातील सभासद चालणार नाहीत
  • 7% कर्ज व्याजदर झालं पाहिजे
  • कंत्राटी कर्मचारी यादी जाहीर करा
  • जिल्ह्य़ाबाहेरील शिक्षकांना सभासदत्व देणारा पोटनियम रद्द करा
  • अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत होणाऱ्या गोंधळाची परंपरा यंदाही कायम राहिल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: D mart softy ice cream issue raises food safety concerns among customers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Bank
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला
1

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
2

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या
3

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
4

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.