Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: दहा वर्षे झाली, उड्डाणपूल होईना! म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडीने नागरिक बेहाल

Jalgaon News: जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे गेल्या दहा वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम रखडल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. म्हसावद-बोरनार रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू असल्याने अवजड वाहने गावातून जात असून मुख्य चौफुलीवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 17, 2026 | 12:33 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दहा वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम रखडले.
  • म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडीचा विळखा.
  • अतिक्रमणामुळे एसटी बससेवाही विस्कळीत.

जळगाव (वा.) तालुक्यातील म्हसावद येथे म्हसावद-बोरनार रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच गेल्या दहा वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम रखडलेले असल्यामुळे अवजड वाहने गावातूनच मार्गक्रमण करत आहेत. परिणामी, म्हसावदच्या मुख्य चौफुलीवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, वाहनधारक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हसावद येथील चौफुली परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याने वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. Jalgaon News:

एरंडोल आगाराच्या बसेस अतिक्रमण

रस्त्यावरील अतिक्रमण आणि अरुंद झालेल्या मार्गामुळे अवजड वाहनांसह एसटी बसेसना मार्ग काढणे कठीण होत आहे. याचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होत असून, एरंडोल आगाराच्या बसेस अतिक्रमण आणि काहींकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे बंद झाल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असताना एसटी बससेवा विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे विशेष हाल होत आहेत.

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

म्हसावद येथील रखडलेले उड्डाणपुलाचे काम मार्गी लावणे, सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे, चौफुलीवरील अतिक्रमण हटविणे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच एरंडोल आगारासह संबंधित परिवहन विभागाने बंद किवा विस्कळीत झालेल्या बसफे यांचा प्रश्न सोडवून ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. म्हसावदसारख्या महत्त्वाच्या गावात मूलभूत वाहतूक सुविधांचा प्रश्न प्रलंबित राहणे ही चितेची बाब आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकमेव बस सुरू असल्याने प्रवाशीही त्रस्त झालेत

सध्या ग्रामीण भागात जळगाव-कुरंगी ही एकमेव बस ये-जा करत असल्याची परिस्थिती असल्याने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, म्हसावद हे पंचक्रोशीतील मोठे आणि महत्वाचे गाव आहे.  येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसीअंतर्गत म्हसावद पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्टेट बैंक ऑफ

इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बैंक तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा अशी महत्वाची प्रशासकीय व आर्थिक कार्यालये आहेत. याठिकाणी दररोज परिसरातील अनेक गावामधून नागरिकांची ये-जा सुरू असते. असे असतानाही वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि एसटी बससेवेच्या समस्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: म्हसावद येथे वाहतूक कोंडी का होत आहे?

    Ans: रखडलेले उड्डाणपूल काम, रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि वाढते अतिक्रमण यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

  • Que: म्हसावद येथील उड्डाणपुलाचे काम किती वर्षांपासून रखडले आहे?

    Ans: उड्डाणपुलाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले आहे.

  • Que: म्हसावद येथे कोणत्या रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू आहे?

    Ans: म्हसावद-बोरनार रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू आहे.

Web Title: Mhasawad traffic jam flyover work pending for 10 years jalgaon rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : विद्यार्थ्यांना अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा
1

Nagpur News : विद्यार्थ्यांना अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा

Swapna shastr̥a :तुमच्याही स्वप्नात या ५ गोष्टी दिसतायत का ? तर समजून घेऊया ‘त्या’ गोष्टी
2

Swapna shastr̥a :तुमच्याही स्वप्नात या ५ गोष्टी दिसतायत का ? तर समजून घेऊया ‘त्या’ गोष्टी

Nagpur News : अधिवेशनाच्या लगबगीत दुष्काळी उपाययोजना रखडल्या; १२८ गावे क्रिटिकल झोनमध्ये
3

Nagpur News : अधिवेशनाच्या लगबगीत दुष्काळी उपाययोजना रखडल्या; १२८ गावे क्रिटिकल झोनमध्ये

‘इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना गुलाम समजतात’; संजय शिरसाटांचा आदित्य ठाकरेंवर आरोप
4

‘इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना गुलाम समजतात’; संजय शिरसाटांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.