राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण होणार
मुंबई : राजस्थानच्या झालावाडमध्ये मुसळधार पावसामुळे मनोहरठाणा परिसरातील पिपलोदी गावातील उच्च प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीचे छत अचानक कोसळून दुर्घटना घडली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने शाळांच्या इमारतींबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता या महत्त्वाच्या असल्याने राज्यातील बाकी दायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने राज्यातील शाळा इमारत सुरक्षितेसाठी राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी तातडीने बैठक घेतली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव समीर सावंत आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, समग्रचे प्रकल्प संचालक संजय यादव, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व शिक्षणाधिकारी सहभागी झाले होते.
हेदेखील वाचा : Raigad Rain Alert: रायगडला अतिवृष्टीचा फटका; सावित्रीने धोका पातळीच्या वर तर कुंडलिका थेट….; शाळांना सुट्टी जाहीर
जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींची तपासणी करून त्यांची बांधकामे नव्याने करण्यासाठी सर्व्हे करून सर्व समावेशक आराखडा तयार करावा. तसेच धोकादायक शाळा इमारतींच्या बांधकामासाठी प्राधान्यक्रम ठरवून जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
शाळा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी राष्ट्रीय सांगितले, आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिक क्षेत्रातील शाळा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटही करावे. अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर याबाबतचा करावा. शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.
हेदेखील वाचा : Jhalawar School Roof collapsed: झालवाडमध्ये शाळेवर काळाचा घाला; छत कोसळून ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १७ जखमी