Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP News: दौंडला मिळाले पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद! पवार कुटुंबाचा विश्वासू चेहरा

गेल्या चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे जिल्हा परिषदेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहेत. अध्यक्षपद आणि उपाध्यक्षांची निवड निश्चित झाली असली तरी त्यासाठी होणारी निवडणुकीची औपचरिकता मात्र होणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 18, 2026 | 12:49 PM
ZP President, Daund News, NCP Politics, Maharashtra Politics,

ZP President, Daund News, NCP Politics, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची वर्णी
  • जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७३ पैकी ५१ जागा जिंकून आपले एकहाती वर्चस्व राखले
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत पक्षाने आपला बालेकिल्ला शाबूत
Pune ZP News: पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या नेत्याला मिळणार, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अखेर पुणे जिल्हाचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दौंड तालुक्याला मिळाले आहे. दौंडचे वीरधवल जगदाळे यांची अध्यक्षपदी, तर आंबेगाव तालुक्याचे विवेक वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एका जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. दरम्यान, विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. महत्त्वाची बाब म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारांनीही घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे या पक्षातील नेत्यालाही जिल्हा परिषदेवर संधी मिळणार का, असा प्रश्न विचारला जात होता.

Pune Politics: पुणे महापालिकेत महायुतीत बिघाडी? आठवले गटाची भाजपवर उघड नाराजी

अखेर, राष्ट्रवादी काँग्रसने इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी श्रीमंत ढोले यांच्याही नावाची चर्चा होती. पण गटनेतेपदी निवड करण्यात आलेला नेते अध्यक्ष होईल, असे नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर ढोले यांना अध्यक्षपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे जिल्हा परिषदेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहेत. अध्यक्षपद आणि उपाध्यक्षांची निवड निश्चित झाली असली तरी त्यासाठी होणारी निवडणुकीची औपचरिकता मात्र होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम करतील. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर दुपारी ३ वाजता विशेष सभा सुरू होईल, त्यानंतर अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. हात उंचावून मतदान घेतले जाईल. पण एकच अर्ज आल्यास ही निवड बिनविरोध घोषित केली जाईल.

Maharashtra Weather Alert: पुढील 48 तास धोक्याचे! वादळी पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढला, 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट

पण ही निवडणुकीची प्रक्रिया केवळ औपचारिकता आहे. ड तालुक्यातील खडकी-देऊळगाव गटातून विजयी झालेले वीरधवल जगदाळे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या नवाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. वीरधव जगदाळे हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. जगदाळे हे सलग तीन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांना प्रशासकीय कामाचाही चांगला अनुभव आहे.

तसेच, पवार कुटुंबाशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. दौंडला दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून, यापूर्वी वैशाली आबणे या पदावर कार्यरत होत्या. अनेक वर्षांनंतर दौंड शहराला लाल दिवा मिळाल्याने कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

 

 

 

Web Title: Daund gets district council presidency close ties with pawar family lead to major post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • Political Update

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
3

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.