Devendra Fadanvis: "हा विजय मूर्खांच्या नंदनवनात..."; हरयाणातील विजयावर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं
मुंबई: काही दिवसांपूर्वी हरयाणा आणि जम्मू काश्मीर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आज दोन्ही राज्यांचे निकाल समोर आले आहेत. हरयाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान हरयाणाची निवडणूक अनेक पक्षांमध्ये पार पडली. कारण भाजप, कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत होती. यात भाजपने हरयाणामध्ये सत्ता राखली आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये कॉँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान हरयाणातील विजयावर मुंबईतील भाजप कार्यालयात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, “आज प्रचंड मोठा विजय साजरा करण्यासाठी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. आज पुन्हा एकदा हरयाणाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे हरयाणामध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होते आहे. आम्ही लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षमुळे हरलो नाही. कोणत्याही विरोधी पक्षात आम्हाला हरवण्याची ताकद नाही. आम्ही केवळ फेक नरेटीव्हमुळे हरलो. फेक नरेटीव्हमुळे लोकसभेत देशात आपल्या काही जागा कमी झाल्या आहेत. ”
हेही वाचा: Haryana Election Results 2024: हरयाणातील विजयामागे कशी होती भाजपची रणनीती?
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “आता आपण महाराष्ट्र आणि देशभरात ठरवले आहे. आता आपण फेक नरेटीव्हला थेट नरेटीव्हने उत्तर द्यायच आहे. याची पहिली कसोटी हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होती. हरयाणाच्या निकालावर महाविकास आघाडीचे नेते काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहीत होते. सकाळी ९ वाजताचा भोंगा हा रात्रीपासून तयारी करून बसला होता. आता काय काय बोलू आणि काय नको असे त्याला वाटत होते. आता मला त्यांना विचारायच आहे की आता कस वाटतंय? जनतेशी बेईमानी करून निवडून आलेल्या लोकांना जनता आता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. जे हरयाणामध्ये घडल तेच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे.आजचा हरयाणाचा विजय हा भाजपचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवणार विजय आहे. तर हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे. ”
🕟 संध्या. ४.३० वा. | ८-१०-२०२४📍 नरिमन पॉईंट, मुंबई.
LIVE | हरियाणा विजयाची हॅट्रिक – भाजपाचा जल्लोष#Maharashtra #Mumbai #BJP https://t.co/NEe61inznm
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 8, 2024
हरयाणामध्ये भाजपने तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त केली आहे. आज आलेल्या निकालानुसार भाजप हरयाणामध्ये ५० जागा जिंकून सत्ता स्थापन करणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आघाडीमध्ये लढले आहेत. दरम्यान या राज्यात कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस आघाडीचे सरकार येताना दिसत आहे. तर हरयाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.