
सांगोला: अडीच ते पावणे तीन वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटला. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार भाजपबरोर सत्तेत आले. सध्या एकनाथ शिंदे हे महायुटी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोला दौऱ्यावर होते. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगोला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सांगोला नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
सांगोला येथे बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महायुती सरकार म्हणजेच फडणवीस सरकारवर मी नाराज नाही. केवळ यांच्या खुर्च्या बदलल्या आहेत. मने नाही बदललेली.”
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मला लाडक्या बहीणींचा लाडका भू अशी ओळख मिळाली हेच माझ्यासाठी सर्वात मोठे पद आहे. आमची पदे बदलली, खुर्च्या बदलल्या पण मने बदलली नाही. इरादे बदलले नाहीत. दिल वही हौसले भी वही कायम है. प्राण जाये पर वचन नहीं जाए. आम्ही असेच एकत्र काम करत राहू.”
📍#सोलापूर | #सांगोला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सांगोला नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटींचा निधी खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला… pic.twitter.com/N7S058lOMk — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 10, 2025
यावेळी बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना देखील टोला हाणला आहे. शिंदे म्हणाले, ” मी लाडका भाऊ तर काही जण बंगल्यात बसलेले फुकट बाबुराव आहेत. साधा भोळा चेहरा अन् भानगडी सोळा, असे काही जण करतात.”
कोल्हापूरमध्ये काय म्हणाले शिंदे?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात महायुतीच्या १० पैकी १० जागा निवडून आल्या. कोल्हापूरकरांना १०० टक्के मार्क मिळाले. कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे. इथला कोणी नाद करायचा नाय आणि हे कोल्हापूरनं निवडणुकीत दाखवून दिलं. पहिल्यांदाच राधानगरी भूदरगडला मंत्री मिळालं, पालक मंत्रीपद मिळालं आणि आरोग्य खातं सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्यानं आरोग्य आणि शिक्षण खातं शिवसेनेकडं मागून घेतलं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Eknath Shinde News: लोकांचा चेहरा भोळा,पण भानगडी सोळा; एकनाथ शिंदेंचा टोला कुणाला?