नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात महायुतीच्या १० पैकी १० जागा निवडून आल्या. कोल्हापूरकरांना १०० टक्के मार्क मिळाले. कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केले आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
कोल्हापूर : सत्तेसाठी इमान विकणाऱ्या, बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्या उबाठाला कोल्हापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत कायमचं फेकून दिले. महायुतीचा स्ट्राईक रेट इतका जबरदस्त होता की विरोधकांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात आयोजित आभार सभेत एकनाथ शिंदे शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काय भूमिका घ्यायची यावर त्यांचा गोंधळ उडाला. काही लोकांचा चेहरा भोळा असतो पण भानगडी सोळा असतात. अशांना कोल्हापूरकरांनी निवडणुकीत तडीपार केलं,” असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. “काहींनी मला हलक्यात घेतलं. मी शांत आहे, शांततेत काम करु द्या, पण मला कोणी छेडलं तर मी सोडत नाही,” असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. “दाढीवर कितीही टीका केली तर याच दाढीनं तुमची मग्रुरी जिरवली. दाढीनं महाभकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली, हे विसरु नका,” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात महायुतीच्या १० पैकी १० जागा निवडून आल्या. कोल्हापूरकरांना १०० टक्के मार्क मिळाले. कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे. इथला कोणी नाद करायचा नाय आणि हे कोल्हापूरनं निवडणुकीत दाखवून दिलं. पहिल्यांदाच राधानगरी भूदरगडला मंत्री मिळालं, पालक मंत्रीपद मिळालं आणि आरोग्य खातं सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्यानं आरोग्य आणि शिक्षण खातं शिवसेनेकडं मागून घेतलं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“आदमापूर येथील सदगुरु संत बाळुमामा यांच्या तीर्थ क्षेत्रासाठी ६५० कोटींचा विकास आराखडा तयार होत आहे. कोल्हापूर संतांची, वारकऱ्यांची, धारकऱ्यांची भूमी आहे. इथल्या तीर्थक्षेत्रांचा, मंदिरांचा, गडकोट किल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही,” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताला सुमारे ८० जेसीबीमधून पुष्पृष्टी करण्यात आली, अभूतपूर्व स्वागताला मोठ्या संख्येनं राधानगरीकर जमले होते.