उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी सेनेच्या आमदारांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
मुंबई : राज्याची राजधानी मुंबई आणि नवी मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली आहे. सर्वत्र पाणी साचले असून लोकल सेवा ठप्प पडली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी 27 मे रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. अत्यावश्यक गोष्ट नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आले आहे. मुंबई ठप्प झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळांची पाहणी करुन माध्यमांशी संवाद साधला आहे.
मुंबई शहराला रेड अलर्ट देण्यात आला असून तुफान पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. लोकल सेवा ठप्प झाली असून रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. तसेच मेट्रो-3 प्रकल्पाला मोठा फटका बसला असून मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. तळांमध्ये उतरल्याप्रमाणे प्रवासी मेट्रो स्थानकांवर उतरत आहेत. या परिस्थितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाऊस बाधित क्षेत्राची पाहणी करुन त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून जनतेला आवाहन केले आहे.
◻️LIVE📍 मुंबई 🗓️ 26-05-2025
📹 बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाऊस बाधित क्षेत्राची पाहणी – लाईव्ह
https://t.co/RE1Vz8mRJp— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 26, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “कंट्रोल रुममधून सर्व स्पॉट पाहिले आहेत. मिलन सबवे, हिंदमाता, अंधेरी, सायन येथील पाणी ओसरलं आहे. तिथे पंपाची व्यवस्था केली आहे. पाऊस जूनच्या 10 तारखेपर्यंत येतो. तेवढी तयारी करतो. पण आता पाऊसच अगोदर आला. नरीमन पॉइंटला 252 मीमी पाऊस पडला. महापालिका मुख्यालयात 294 मीमी पडला. 50-50 मीमी पावसाची अपेक्षा असलेल्या ठिकाणी जास्त पाऊस पडला. त्यामुळे ढगफुटीसारखं झालं, पण आता सर्व सुरळीत झाले आहे. वाहतूक सुरळीत झाली,” असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर मुंबईमधील रस्त्यांवर पाणी साचले यामुळे पालिकेच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढण्यात येत आहे. याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, “नालेसफाईचे काम सुरू आहे, तेही लवकरच पूर्ण होईल. नालेसफाईसाठी एआयचा वापर करण्यात आला आहे. रोबोटच्या सहाय्याने साफसफाई केली जात आहे. एकंदरीत पावसानेच लवकर आगमन केल्याने ही सगळी धावपळ झाली आहे. यातून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी मुख्यमंत्री आणि बीएमसीची बैठक घेतली होती. यामध्ये इतर रेल्वे, पीडबल्यूडी, एमएमआरडीसह आर्मी, नेवी, एनडीआरएफसह सर्व अलर्ट आहेत. लोकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी मुंबई महापालिका घेईल,” असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.